शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डाळींच्या आयातीवर निर्बंध जारी राहणार : केंद्राचा निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:36 IST

डाळींच्या आयातीवर केंद्र सरकारने ३१ मार्च २०१९ पर्यंत टाकलेले निर्बंध हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळींच्या पिकाला रास्त भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थिती स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डाळींच्या आयातीवर केंद्र सरकारने ३१ मार्च २०१९ पर्यंत टाकलेले निर्बंध हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळींच्या पिकाला रास्त भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना पिकाची योग्य किंमत मिळावी, या उद्देशाने डाळींच्या आयातीवर मात्रात्मक निर्बंध लावले होते. गेल्यावर्षी डाळींचे उत्पादन विक्रमी झाल्यानंतर बाजारात शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नव्हता. एवढेच नव्हे तर डाळींची आयात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आधारभाव मूल्यांहून कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी त्रस्त होते. गेल्यावर्षी देशात सर्व प्रकारच्या डाळींचे उत्पादन २२५ लाख टन झाले होते. मागणी आणि पुरवठा तफावत न राहिल्यामुळे डाळींच्या भावात प्रचंड घसरण झाली होती. सरकारने साठवणुकीची मर्यादा हटवून डाळींची निर्यात सुरू केली होती. त्यानंतरही डाळींचे भाव वाढले नव्हते. शेतकऱ्यांना जास्त भाव मिळावा म्हणून अखेर सरकारने डाळींच्या आयातीवर मात्रात्मक प्रतिबंध लावले.वाटाण्याच्या आयातीवर प्रतिबंध आणि मसूर, हरभऱ्याच्या आयातीवर शुल्क वाढविले. पण एका याचिकेवर सुनावणी करताना चेन्नई उच्च न्यायालयाने सरकारच्या डाळीच्या आयातीच्या निर्णयावर स्टे दिला होता. त्यामुळे व्यापाऱ्यातर्फे चेन्नई येथून डाळींची आयात सुरू झाल्यानंतर सरकारच्या प्रयत्नांना अपयश आले होते. १५ दिवसांपूर्वी चेन्नई उच्च न्यायालयात सुनावणीनंतर न्यायमूर्तींनी निर्णय सुरक्षित ठेवला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास अडचण येत होती. पण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थिती स्पष्ट झाली असून आयातीवर निर्बंध लावण्याचा सरकारचा निर्णय योग्य ठरविला आहे. यापूर्वी डीजीएफटीकडे आयातीवर प्रतिबंध लावण्याचा अधिकार असल्याचे सांगून गुजरात उच्च न्यायालयाने स्टे देण्यास नकार दिला होता. आता डाळींच्या आयातीवर टाकलेले प्रतिबंध अधिकृत झाले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई, अहमदाबाद, जयपूर आणि अन्य राज्यातील हायकोर्टाने डाळींच्या आयातीविरोधात सरकारच्या निर्णयावर दिलेले स्टे निरस्त करून केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरविला. आता हायकोर्टाला डाळींच्या आयात निर्बंधावर स्टे देता येणार नाही. या निर्णयाचे प्रताप मोटवानी यांनी स्वागत केले आहे.

 

टॅग्स :foodअन्नCentral Governmentकेंद्र सरकार