शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आयटीआय विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा (आॅल इंडिया ट्रेड टेस्ट) निकाल जाहीर करण्यास मनाई केली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका : दोन पद्धतीने परीक्षा घेण्यावर आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आयटीआय विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा (आॅल इंडिया ट्रेड टेस्ट) निकाल जाहीर करण्यास मनाई केली.ही परीक्षा पुणे, नाशिक व नागपूर येथील काही निवडक केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून अन्य सर्व केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यावर आक्षेप घेऊन सेलेंद्र्र गुजर व कुणाल हुमणे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. उद्यापासून आॅफलाईन तर, २० आॅगस्टपासून आॅनलाईन परीक्षेला सुरुवात होणार आहे. परिणामी, या परीक्षेवर ऐनवेळी स्थगिती दिल्यास मोठी अडचण निर्माण होईल ही बाब लक्षात घेता न्यायालयाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला परीक्षा घेण्याची परवानगी दिली, पण पुढील आदेशापर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई केली. तसेच, संचालनालय, केंद्रीय कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे महासंचालक, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद आणि राज्याच्या कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावून यावर १४ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे व अ‍ॅड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.तक्रारींची दखल नाही१६ जुलै २०१८ रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सर्व आयटीआय महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून आॅनलाईन परीक्षेवर आक्षेप विचारले होते. त्या आधारावर संचालनालयाने २७ जुलै रोजी काही आयटीआय संस्थांना आॅफलाईन परीक्षा घेण्याची परवानगी दिली. तसेच, यासंदर्भात ३० जुलै रोजी आदेश जारी करून पुणे, नाशिक व नागपूर येथील निवडक केंद्रांवर आॅफलाईन परीक्षा घेण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांसह इतरांनी याला विरोध केला होता. संचालनालयाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु, त्यांची दखल घेण्यात आली नाही.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयexamपरीक्षा