शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानक व हॉस्पिटल परिसरात फेरीवाल्यांना बंदी; रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 11:32 IST

राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे दोन महिन्यात सर्वेक्षण करण्यात येईल. पथविक्रेता समित्या गठित करण्यात येतील. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर तर हॉस्पिटलपासून १०० मीटरचा परिसर नो फेरीवाला झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देफूटपाथ व रस्ते मोकळे करण्याच्या सूचना

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे दोन महिन्यात सर्वेक्षण करण्यात येईल. पथविक्रेता समित्या गठित करण्यात येतील. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर तर हॉस्पिटलपासून १०० मीटरचा परिसर नो फेरीवाला झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात फेरीवाल्यांना बंदी असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.महापालिका व नगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०१३ रोजी आदेश दिलेले होते. या आदेशास अनुसरून केंद्र शासनाने मार्च २०१४ मध्ये पदपथ विक्रेते अधिनियम लागू के ला आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य शासनाने पथविके्र ता योजना लागू केली आहे. त्यानुसार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, पथविक्रेता समिती स्थापन करणे, विक्री प्रक्षेत्रे निश्चित करणे, पात्र पथविक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.सदस्य शरद रणपिसे, संजय दत्त आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता. फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे संजय दत्त यांनी निदर्शनास आणले. नागपूर शहरात ५० हजार फेरीवाले आहेत. त्यांना पट्टे आखून देण्याची मागणी प्रकाश गजभिये यांनी केली. फूटपाथ हे पादचाऱ्यांसाठी आहेत. ते मोकळे असले पाहिजे, असे मत प्रवीण दरेकर यांनी मांडले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनीही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.लोकसंख्येच्या २ टक्के फेरीवाले२०१४ पर्यंतच्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहराच्या लोकसंख्येच्या २ टक्क्याहून अधिक फेरीवाले नसावेत. फेरीवाल्यांना व्यवसायाचा अधिकार असला तरी पादचाऱ्यांनाही फूटपाथवर चालण्याचा अधिकार असल्याचे रणजित पाटील यांनी प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७