शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:00 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्य कोतवाल संघटनेच्या मोर्चाने पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पहिल्याच दिवशी धडक दिली. राज्यभरातून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी दुपारपर्यंत महसूल मंत्री येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मंत्री येत नसल्याचे पाहत सायंकाळी ३० जणांचे शिष्टमंडळ भेटायला गेले. परंतु मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहत मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती. मुसळधार पावसातही मोर्चेकरी रस्त्यावर होते. हा मोर्चा चिघळण्याच्या स्थितीत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

ठळक मुद्देराज्य कोतवाल संघटनेचा मोर्चा : मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्य कोतवाल संघटनेच्या मोर्चाने पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पहिल्याच दिवशी धडक दिली. राज्यभरातून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी दुपारपर्यंत महसूल मंत्री येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मंत्री येत नसल्याचे पाहत सायंकाळी ३० जणांचे शिष्टमंडळ भेटायला गेले. परंतु मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहत मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती. मुसळधार पावसातही मोर्चेकरी रस्त्यावर होते. हा मोर्चा चिघळण्याच्या स्थितीत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.मोर्चाचे नेतृत्व करणारे संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रवीण कर्डक व राज्य अध्यक्ष संजय धरम म्हणाले, २०१६च्या हिवाळी अधिवेशनात संघटनेकडून मोर्चा काढल्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक महिन्याच्या आत प्रश्न सुटेल, तुम्हाला या पुढे आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असे आश्वासन दिले होते. याचदरम्यान २८ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ‘एक छत्र’ योजना तयार केली. वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. यात कोतवाल, पोलीस पाटील व आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना या योजनेत समाविष्ट केले. परंतु कोतवाल आणि आशा वर्कर या दोघांच्या कामात तफावत आहे. त्यांची तुलना कोतवालांबरोबर करू नये. कोतवालांची मागणी चतुर्थ श्रेणी असल्याचे रेटून धरले. राज्यात १२ हजार ६३७ कोतवाल आहेत. पाच हजार रुपये मानधन आणि १० रुपये चप्पल भत्ता मिळतो. एवढ्या पैशांमध्ये जगायचे कसे, हा प्रश्न आहे. गेल्या ६८ वर्षांपासून शासनदरबारी कोतवालांना न्याय न मिळाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.मोर्चेकरी भिजलेसायंकाळी झालेल्या जोरदार पावसातही मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती. याच दरम्यान ३० जणांचे शिष्टमंडळ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेले होते. मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठी होती. दिवसभर मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत हल्लाबोल केला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा