एसी कोच फुल्ल : केवळ स्लिपर क्लासमध्ये बर्थ शिल्लक नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी रेल्वेस्थानकावरून थेट गोव्यासाठी २० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. थेट गोव्यासाठी उन्हाळ््यात विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यामुळे नागपूरकरांच्या उन्हाळ््यातील सुट्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. तर उन्हाळ््याचा कालावधी असल्यामुळे या गाडीतील एसी कोच फुल्ल झाले असून केवळ स्लिपर क्लासमध्ये बर्थ शिल्लक आहेत. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी २६ जानेवारीला नागपूरवरून मडगावसाठी विशेष रेल्वेगाडी सोडली होती. या गाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर २५ फेब्रुवारीला पुन्हा नागपूर-मडगाव ही रेल्वेगाडी सोडली होती. या गाडीलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे रेल्वे प्रशासनाने अजनीवरून मडगावसाठी २० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१११९ अजनी-मडगाव विशेष रेल्वेगाडी ३ एप्रिल ते ५ जून दरम्यान प्रत्येक सोमवारी अजनीवरून सायंकाळी ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मडगावला रात्री ९.३० वाजता पोहोचेल. उन्हाळ््याचे दिवस असल्यामुळे या गाडीतील एसी कोचला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ३ एप्रिलला सुटणाऱ्या गाडीत एसी थ्रीमध्ये ३०, एसी टु मध्ये २६ बर्थच शिल्लक आहेत. १० एप्रिलला एसी टु मध्ये २६, १७ एप्रिलला २६, १ मे रोजी १९ आणि ८ मे रोजी फक्त २६ बर्थ शिल्लक आहेत. केवळ स्लिपर क्लासमध्ये बर्थ शिल्लक असून स्लिपर क्लासचे बुकिंगही जोरात सुरू असल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)
अजनी-गोवा स्पेशलला प्रवाशांचा प्रतिसाद
By admin | Updated: March 13, 2017 02:20 IST