शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संशोधकांविषयी आदर, फ्रान्सहून आतिश दाभोळकरांनी जागवल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:02 IST

१९९५ साली मी नुकतीच ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती व नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या कार्यालयात संशोधनकार्यात व्यस्त होतो. अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला.

- योगेश पांडे नागपूर : १९९५ साली मी नुकतीच ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती व नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या कार्यालयात संशोधनकार्यात व्यस्त होतो. अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला, समोरचे चित्र स्वप्नवत होते. ज्यांना संशोधन जगतगुरु मानायचे ते डॉ. स्टीफन हॉकिंग समोर ‘व्हीलचेअर’वर होते. माझा शोधनिबंध वाचून जागतिक कीर्तीचा हा शास्त्रज्ञ मला भेटण्यासाठी व त्यांच्या मनातील एक शंका विचारण्यासाठी चक्क माझ्या दारी आला होता.मूळचे भारतीय असलेले संशोधक डॉ. आतिश दाभोळकर यांनी फ्रान्सहून बोलताना ‘लोकमत’जवळ ही आठवण सांगितली. ते म्हणाले, डॉ. स्टीफन हॉकिंग यांच्या विविध शोधपत्रिका वाचून त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. १९९५ साली मी ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’मध्ये असताना ‘स्ट्रींग थिअरी’वरील माझा शोधनिबंध वाचून तेच मला शोधत माझ्या कार्यालयात आले. त्यानंतर पुढे त्यांच्याशी अनेकदा संपर्क आला.डॉ. दाभोळकर यांच्या प्रयत्नांतून २००१ साली मुंबईत झालेल्या ‘स्ट्रींग’ला डॉ. स्टीफन हॉकिंग उपस्थित होते. यावेळी त्यांचे सायन येथील षण्मुखानंद सभागृहात व्याख्यानदेखील झाले होते.डॉ. हॉकिंग यांना भारतीय संशोधकांविषयी विशेष आदर होता. जगभरात भारतीय संशोधक भौतिकशास्त्र, गणित, ‘स्ट्रींग थिअरी’, ‘ब्लॅक होल्स’ आणि ‘क्वॉन्टम् ग्र्रॅव्हिटी’ या क्षेत्रांमध्ये करत असलेल्या कार्याची त्यांना माहिती होती. त्यामुळे ते नेहमी भारतीयांबाबत गौरवोद्गार काढायचे, असे डॉ. दाभोळकर यांनी सांगितले.‘जिंदादील’ होते ‘हॉकिंग’जगाने नेहमी व्हीलचेअरवर बसलेले व विचारात गुंतलेले हॉकिंग पाहिले. मात्र, त्यांचे व्यक्तिमत्त्व दिलखुलास आणि काहीसे मिश्किलदेखील होते. स्वत:च्या मर्जीने ते हलू शकत नसतानादेखील समोरच्याला जगण्याची कला शिकवून जात. गंभीर वातावरणातदेखील हळूच एखादा ‘जोक’ ऐकवत सर्वांना हसायला भाग पाडत.एका मुलीला ‘मल्टिपल सेरॉसिस’ने ग्रासले होते व तिच्या आजोबांनी मला त्या मुलीवर लिहिलेली कविता डॉ. हॉकिंग यांना पाठविण्याची विनंती केली होती. मी अगदी सहज म्हणून त्यांना ती पाठविली व काही वेळातच त्या कवितेचे कौतुक करणारा त्यांना ‘मेल’ आला.