शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी रिसोर्स बँक तयार करणार : कृषिमंत्री दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 21:28 IST

शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती उपलब्ध करून देण्यासोबतच राज्यातील कृषी संशोधन व प्रगतिशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी ‘रिसोर्स बँक’तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी येथे केली.

ठळक मुद्देप्रत्येक कार्यालयात सन्मान व मार्गदर्शन केंद्र, शेतकऱ्यांशी थेट संवाद वाढविण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती उपलब्ध करून देण्यासोबतच राज्यातील कृषी संशोधन व प्रगतिशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी ‘रिसोर्स बँक’तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी येथे केली.वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीच्या कृषी विषयक उपक्रमाचा तसेच कृषी विषयक व योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी तथा वनामती संचालक रवींद्र ठाकरे, कृषी विद्यापीठाचे संचालक दिलीप मानकर, सहसंचालक रवींद्र भोसले, सुभाष नागरे, कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.डी.एम.पंचभाई,वनामतीचे अपर संचालक डॉ. अर्चना कडू, सी.पी.टी.पी.च्या संचालक सुवर्णा पांडे उपस्थित होते.कृषी विभागाच्या विविध शेतविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, तसेच त्यांच्या शेतीविषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांसोबत संवाद वाढवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची सूचनाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली. शेतकऱ्यांना एका छताखाली कृषी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देऊन प्रत्येक तालुका, उपविभागीय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘सन्मान आणि मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. येथे येणाºया प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.वनामतीला प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा दर्जाप्रभावी तांत्रिक मनुष्यबळ व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या क्षमता बांधणीसाठी वनामती व राज्यातील इतर सात रामेती संस्था यांच्या सोईसुविधांचे सक्षमीकरण करणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. रिसोर्स बँकेच्या माध्यमातून कृषी संशोधन, प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव रिसोर्स बँकेच्यामाध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील. ही माहिती शेती करताना साहाय्यभूत ठरेल.‘एक दिवस शेतावर’ उपक्रम राबवणारशेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत कृषिमंत्री महिन्यातून ‘एक दिवस शेतावर’ या उपक्रमात सहभागी होणार आहे. तसेच कृषी सचिव, आयुक्त यांनी पंधरवड्यातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतावर उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व कृषी उत्पादनासंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. सचिव, कृषी अधिकाऱ्यांप्रमाणे मी देखील 'कृषिमंत्री' या नात्याने दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, उत्पादकता आणि उपलब्ध बाजारपेठ या विषयी त्यांना मार्गदर्शन करता येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कारकृषिमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विभागातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे उत्कृष्ट शेती केलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भातशेतीमध्ये मत्स्य पालनासाठी गडचिरोलीचे गजेंद्र ठाकरे, भात लागवडीसाठी देवानंद दुमाने, सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी मंगेश चापले, शेततळ्यात मत्स्य उत्पादनासाठी उत्तम मिस्त्री, जैविक कीडनाशक उत्पादन व सेंद्रिय पध्दतीची फळलागवडीसाठी गोंदियाचे महेंद्र्र ठाकूर, भंडाराचे संजय एकापुरे यांना सामूहिक शेती व शेतमालाची थेट विक्री यासाठी, काटोल येथील मनोज जवंजाळ यांना उद्यान पंडित तर वर्धेचे कुंदन वाघमारे यांना शेळीपालन व केळी लागवडीसाठी, सुजाता भोयर यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल, चंद्र्रपूर जिल्ह्यातील पांडुरंग कोकोडे यांना भाजीपाला, हळद लागवड तसेच विक्री, मधुमक्षिका पालन या कार्याकरिता कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्री