शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संकल्प कॅशलेसचा, व्यवहार नगदीचाच

By admin | Updated: December 29, 2016 02:30 IST

सरकारी कार्यालयात कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध स्तरावर जनजागृती मोहीम राबविली जात आहे.

सरकारी कार्यालये कधी होतील कॅशलेस ? : मनपात सुविधा, नागरिकांचा प्रतिसाद नाही नागपूर : सरकारी कार्यालयात कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध स्तरावर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम राबविणाऱ्या सरकारी कार्यालयातच दिव्याखाली अंधार आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू कार्यालय आणि तहसील कार्यालयात रोखीनेच व्यवहार करावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कॅशलेसच्या गप्पा मारण्यापूर्वी आपली कार्यालयीन पद्धती डिजिटल कशी होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकमत चमूने बुधवारी जिल्हा - तहसील प्रशासनातील सेतू कार्यालय आणि महापालिकेतील विविध झोनची पाहणी केली असता ही वस्तुस्थिती समोर आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूत सुविधा नाही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू कार्यालयात विविध प्रमाणपत्रासाठी दररोज शेकडो लोक येतात. शेकडो प्रमाणपत्र रोज तयार होतात. यासाठी आकारण्यात येणारे शुल्क भरण्यासाठी एक कॅश काऊंटर आहे. काऊंटरवर आॅनलाईन व्यवहाराची सोय नाही. यापूर्वी सर्व व्यवहार हा रोखीनेच सुरू होता. आजही तो रोखीनेच सुरू आहे. स्क्रॅप मशीन किंवा आॅनलाईन व्यवहाराची कुठलीही सोय उपलब्ध नाही. यासंदर्भात विचारणा केली असता अद्याप आॅनलाईन सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. सेतू कार्यालय थेट बँकेशी ‘कनेक्टेड’ सेतू कार्यालयात रोख रक्कम स्वीकारली जात असली तरी सेतू कार्यालय हे थेट बँकेशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जी रक्कम जमा होते ती थेट बँकेतच जमा होते. सेतू कार्यालयातच स्टेट बँकेचे एक काऊंटर आहे. त्यामुळे ती एक प्रकारची आॅनलाईन व्यवस्थाच आहे. - केएनके राव, निवासी उपजिल्हाधिकारी तहसील कार्यालयातही रोखीनेच व्यवहार शहर तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयातही रोखीनेच व्यवहार सुरू आहेत. येथे कुठलीही स्क्रॅप किंंवा आॅनलाईनची सुविधा उपलब्ध नाही. याशिवाय तहसील कार्यालयातील परिसरातील असेच चित्र आहे. तहसील कार्यालय परिसरातील मुद्रांक विक्रेत्यांचा व्यवहार सुद्धा अजूनही आॅनलाईन झालेला नाही. तो रोखीनेच सुरू आहे. ५०० रुपये पर्यंतचे मुद्रांक विक्रेते रोखीनेच विकत आहेत.