शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बसपात फेरबदल, कार्यकर्त्यांत असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:10 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर बसपात फेरबदल करण्यात आला आहे. बसपाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप मेश्राम यांची तर शहराध्यक्ष म्हणून नितीन नागदेवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या नियुक्तीमुळे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्ष - शहराध्यक्ष बदललेसंदीप मेश्राम यांची जिल्हाध्यक्ष तर नितीन नागदेवते शहराध्यक्षपदी नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर बसपात फेरबदल करण्यात आला आहे. बसपाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप मेश्राम यांची तर शहराध्यक्ष म्हणून नितीन नागदेवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या नियुक्तीमुळे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.बहुजन समाज पार्टी नागपूर झोनमधील सातही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या आढाव्यानंतर पक्षाचे प्रदेश प्रभारी आ. राम अचल राजभर, राज्याचे प्रभारी तथा नागपूर झोन इन्चार्ज प्रमोद रैना, प्रदेश प्रभारी अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेश प्रभारी कृष्णा बेले, प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, प्रदेश सचिव भाऊसाहेब गोंडाणे, प्रदेश सचिव रूपेश बागेश्वर यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु याबाबत पक्षाचे अधिकृत पत्र जारी करण्यात आलेले नाही. यासंदर्भात रुपेश बागेश्वर आणि भाऊ गोंडाणे यांना विचारणा केली असता त्यांनी ही नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती केली असली तरी, या नियुक्तीमुळे बसपाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.लोकसभा निवडणुकीत बसपाची कामगिरी यंदा अतिशय निराशाजनक राहिली. स्वत: उमेदवारानेच पक्षविरोधी कार्य केले म्हणून पक्षातून काढण्यात आले तर उमेदवाराने पदाधिकाऱ्यांवरच पक्षविरोधी कार्य केल्याचा आरोप केला. यामुळे सामान्य कार्यकर्ता प्रचंड दुखावलेला आहे. पक्षांतर्गत असलेली ही धुसफूस अजूनही थांबलेली दिसत नाही. १० तारखेला झालेल्या आढावा बैठकीतही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांची नाराजी आणखीनच वाढली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची ओळख काय? ते कोणत्या कमिटीवर कार्यरत होते, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. बसपाचे शहराध्यक्ष प्रकाश गजभिये व जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर यांना याबाबत विचारणा केली असता आम्हाला काहीही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. अशी नियुक्ती होत नाही. प्रदेशाध्यक्षाचे अधिकृत पत्र लागते. आम्हालाही याबाबत कळविण्यात आले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच बसपामधील नाराजी या नियुक्तीनंतर वाढण्याची शक्यता बळावली आहे.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPoliticsराजकारण