शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणामुळे सत्ता मिळाली, रिमोट कंट्रोल मात्र नवऱ्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:29 IST

आरक्षणामुळे महिलांना राजकारणात वाटा मिळाला. पण महिलांची मानसिकता अजूनही बदलली नाही. गुलामीच्या चाब्या आजही त्यांनी आपल्या कंबरेला खोचून ठेवल्या आहेत. आरक्षणामुळे महिलांना सत्ता मिळविता आली. पण खुर्ची सांभाळता आली नाही. ती आजही सत्तेची बाहुली असून, सत्तेचा रिमोट मात्र नवऱ्याच्या हाती दिला असल्याची भावना जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला वक्त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ : जागतिक महिला दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरक्षणामुळे महिलांना राजकारणात वाटा मिळाला. पण महिलांची मानसिकता अजूनही बदलली नाही. गुलामीच्या चाब्या आजही त्यांनी आपल्या कंबरेला खोचून ठेवल्या आहेत. आरक्षणामुळे महिलांना सत्ता मिळविता आली. पण खुर्ची सांभाळता आली नाही. ती आजही सत्तेची बाहुली असून, सत्तेचा रिमोट मात्र नवऱ्याच्या हाती दिला असल्याची भावना जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला वक्त्यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, असोसिएशन ऑफ पीस अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट व बापुजी समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात शनिवारी करण्यात आले.. यानिमित्त ‘आजच्या राजकीय परिस्थितीत स्त्रियांचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर बोलताना वक्ता म्हणून डॉ. अंजली साळवे विटणकर व सुषमा भड म्हणाल्या की, प्रत्येक राजकीय पक्षाकडे महिला आघाडी आहे. पण या महिला आघाडीला कुठलेही स्थान नाही. महिला आघाडीने पक्षासोबत बार्गेनिंग केले नाही. जे पक्षाकडून मिळाले ते सहज स्व्ीाकारले. त्यामुळे राजकीय स्थान मिळणार तरी कसे? तीळसंक्रांतीच्या कार्यक्रमाला गठ्ठ्याने महिला एकमेकांच्या घरी जातात. पण स्त्री सक्षमीकरणाचे वैचारिक मंथन होत असताना बोटावर मोजण्याइतपतच महिला उपस्थित असतात. कारण महिलांना गुलामगिरीतच राहण्याची सवय झाली आहे. त्यांचे लक्ष स्वतंत्र कपडे, दागिने, टीव्ही, घर यातच आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शरयू तायवाडे, निर्मला मानमोडे, सुनील जुमळे उपस्थित होते. याप्रसंगी खेळाडू सुनिता धोटे, माधुरी चौधरी व शोभा राऊत यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून अ‍ॅड. रेखा बारहाते यांनी महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांनीच यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संचालन अ‍ॅड. समीक्षा गणेशे, आभार नंदा देशमुख यांनी मानले.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनOBCअन्य मागासवर्गीय जाती