शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘भिवापुरी’ मिरचीच्या उत्पादन वाढीसाठी संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 10:33 IST

भिवापुरी मिरचीसह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध जी-४ मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात दोन्ही राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत करार करण्यात आला आहे. यादृष्टीने जोमाने काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षात याचे परिणाम दिसून येतील.

ठळक मुद्देदोन ते तीन वर्षांत दिसणार परिणाम कृषी विद्यापीठांमध्ये करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील भिवापुरी मिरचीला जगात मान्यता आहे. परंतु पारंपरिक लागवड आणि कीड रोगामुळे मिरचीचे उत्पादन व क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. यावर शासन व कृषी शास्त्रज्ञ गंभीर असून भिवापुरी मिरचीसह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध जी-४ मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात दोन्ही राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत करार करण्यात आला आहे. यादृष्टीने जोमाने काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षात याचे परिणाम दिसून येतील.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फलोत्पादन विभागातील सहयोगी प्राध्यापक एस.एम. घावडे यांनी याबाबत माहिती दिली. कृषी जिल्हा महोत्सवांतर्गत मिरची विक्री व व्यवस्थापन यावर ते मार्गदर्शन करीत होते. प्रा. घावडे यांनी सांगितले की, भिवापुरी मिरची ही जगप्रसिद्ध आहे. त्याचप्रकारे आंध्र प्रदेशातील गुंटूर हे क्षेत्र संपूर्ण मिरचीचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जी-४ नावाने तेथील मिरची ओळखली जाते. काही वर्षांपासून रोगामुळे आणि पारंपरिक पद्धतीने लागवड होत असल्याने मिरचीचे क्षेत्र घटत चालले आहे. त्यामुळे उत्पादनही कमी होत आहे. याला शासनासह कृषी शास्त्रज्ञांनीही गांभीर्याने घेतले असून, मिरचीची आधुनिक पद्धतीने लागवड व्हावी आणि शेतकऱ्यांना मिरचीचे नवीन वाण व तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून वाराणसी येथील शासनाची प्रसिद्ध संशोधन संस्था आॅल इंडिया को-आॅर्डिनेटर रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून गुंटूर आंध्र प्रदेश आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत भिवापुरी मिरचीसोबतच अचलपुरी, जयंती या मिरचीचे आणि गुंटूर येथील जी-४ या मिरचीचे उत्पादन, क्षेत्र वाढविण्याबाबत दोन्ही विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. दोन ते तीन वर्षात त्याचे परिणाम पुढे येतील.वायगाव हळद जगात विख्यातवायगाव हळदबाबत मार्गदर्शन करताना प्रा. घावडे यांनी सांगितले की, वायगाव हळदीने जगात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचे कारण म्हणजे यात असलेल्या ‘कुरकमीन’ हा पदार्थ होय. हळदीचा स्वाद आणि रंग हे कुरकमीन या पदार्थामुळे ठरते. या रंग व स्वादामुळेच त्याला जगात मागणी आहे. सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड केल्यास कुरकमीन पदार्थाचे प्रमाण वाढू शकते, असे घावडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती