शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे संशोधन येतेय फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 09:09 IST

केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेने संशोधन केलेल्या फळांची चव चाखायला मिळणार आहे.

ठळक मुद्देतीन प्रजातींना कृषी विद्यापीठाची मान्यतालवकरच मिळणार चाखायला

ऑनलाईन लोकमत 

नागपूर : नागपूरकरांनी संत्रा महोत्सवात, अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेच्या स्टॉलला भेट देऊन त्यांनी संशोधन केलेल्या फळांची माहिती जाणून घेतली, संस्थेने संशोधन केलेल्या संत्र्याच्या वेगवेगळ्या प्रजातींकडे लोक आकर्षितही झाले. पण त्याची टेस्ट लोकांना चाखायला मिळाली नव्हती. पण लवकरच संस्थेने संशोधन केलेली फळं चाखायला मिळणार आहे.शहरातील लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या तीन नव्या प्रजातींचे संशोधन केले आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी या प्रजातींचा नव्या प्रजाती म्हणून स्वीकार केला आहे. यात कटर व्हॅलेन्शिया, फ्लेम ग्रेपफ्रुट आणि एनआरसीसी पुम्मेलो-५ अशी या तीनही प्रजातींची शास्त्रीय नावे आहेत. तीनही प्रजाती बियारहित आहेत. २०१६ साली या प्रजातींवरील संशोधनास सुरुवात झाली. अद्याप या प्रजातींना बाजारात मान्यता मिळालेली नाही. फळाला मान्यता देण्याचा अधिकार हा राज्याच्या प्रजाती मान्य समितीला आहे. कृषी विद्यापीठांनी या प्रजातींना स्वीकारल्यामुळे समितीसुद्धा लवकरच मान्यता देईल, अशी अपेक्षा संस्थेच्या संचालकाना आहे. सध्या संस्थेने येणाऱ्या मोसमासाठी या प्रजातीच्या रोपट्यांची विक्री सुरू केली आहे. यातील कटर व्हॅलेन्शिया हे फळ प्रक्रियेद्वारे तयार करण्यात येणाºया उत्पादनांसाठी महत्त्वाचे मानले जाते. या फळावर सुमारे १० वर्ष संशोधन करण्यात आले. फ्लेम ग्रेपफ्रुट हे बियारहित फळ आहे. तसेच सर्वाधिक रसाळ आहे. याखेरीज एनआरसीसी पुम्पेलो-५ हे फळ अधिक गोड असून याचे वजनसुद्धा अधिक आहे.

आठ महिने संत्रा उपलब्ध होईलसाधारणत: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संत्रा बाजारात उपलब्ध होतो. परंतु या तिन्ही प्रजातींना मान्यता मिळाल्यावर आॅक्टोबर ते मे या काळात संत्रा बाजारात उपलब्ध होईल. प्रत्येक प्रजातीचे स्वतंत्र गुणधर्म असल्याने याची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.- एम.एस. लदानिया, संचालक,केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था

टॅग्स :fruitsफळे