शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कत्तलखान्यातील जनावरांची मुक्तता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:58 IST

निर्दयपणे कोंबून ठेवण्यात आलेल्या कसायाच्या तावडीतील १३ जनावरांची पाचपावलीत पोलिसांनी मुक्तता केली. एवढेच नव्हे तर चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १५०० किलो मांसासह १० लाख १० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. सोमवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली.

ठळक मुद्दे१० लाखांचा मुद्देमाल जप्त : चौघांना अटक, पाचपावली पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निर्दयपणे कोंबून ठेवण्यात आलेल्या कसायाच्या तावडीतील १३ जनावरांची पाचपावलीत पोलिसांनी मुक्तता केली. एवढेच नव्हे तर चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १५०० किलो मांसासह १० लाख १० हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. सोमवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली.पाचपावलीतील खंतेनगर नाल्याच्या बाजूला एक जुना कत्तलखाना आहे. तेथे जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती सोमवारी पहाटे पाचपावली पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी पहाटे २.३० च्या सुमारास त्या ठिकाणी छापा मारला. यावेळी एका ट्रकमध्ये १५०० किलो मांस पोलिसांना मिळाले तर, अत्यंत निर्दयपणे बांधून, कोंडून ठेवण्यात आलेली १३ जनावरेही पोलिसांना दिसली. त्यांची मुक्तता करण्यात आली. पोलिसांचा छापा पडल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेले आरोपी साहिद रजा सिद्दीक हुसेन (वय २३, सक्करदरा), शेख जाबीर शेख जब्बार (वय ३९, रा. चिराग अली चौक, टेका), अलीम खान गफ्फूर खान (वय ४०, रा. यशोधरानगर) आणि मोहम्मद शफी हाजी मोहम्मद शब्बीर (वय ३६, रा. आझादनगर, टेका) या चौघांना अटक करण्यात आली. या चौघांच्या तावडीतून गोमांस, जनावरे आणि ट्रक यासह एकूण १० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजय जाधव, सहायक निरीक्षक एस. एस. सुरोशे, पोलीस उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, हवालदार चिंतामण डाखोळे, विलास चव्हाण, रविशंकर मिश्रा, विजय लांडे, सुनील वानखेडे आणि सचिन सोनवणे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिस