शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता, आतापर्यंत ५० वाहने जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:13 IST

लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यक लागणार आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५० वाहने जमा झाली आहेत.

ठळक मुद्देनोटीस पाठवणारमंगळवारपासून जप्ती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यक लागणार आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५० वाहने जमा झाली आहेत. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने शंभरावर विभागांना निवडणूक विभागाकडून नोटीस पाठविण्यात येणार असून सोमवारी वाहन जमा न झाल्यास मंगळवारपासून वाहन जप्ती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचार सभांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामासाठी निवडणूक विभागाला १२०० वाहनांची आवश्यकता आहे. यात ६०० जीप, ४५० बस, १०० ट्रक, २४ अ‍ॅम्ब्युलन्स तर २४ अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे.यात काही वाहने कंत्राटी घेण्यात येणार आहे. २५० वाहने ही शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी विभागप्रमुखांना पत्र पाठविण्यात आले. मात्र आतापर्यंत फक्त ५० वाहने प्रशासनाकडे जमा झाली आहेत. विभागाकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे.यामुळे निवडणूक प्रशासनाकडून जवळपास १०० विभागांना नोटीस पाठविणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारला वाहन जमा न झाल्यास मंगळवारपासून वाहन जप्तीची मोहीत सुरू करण्यात येणार आहे.यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने एक पथक तयार केले असून यात ट्राफिक, आरटीओ तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समोवश असणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक