शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

धाकापोटी प्रकरण मिटवण्याची विनंती

By admin | Updated: January 6, 2016 03:46 IST

शटर उचलून सरळ आतमध्ये शिरल्यानंतर पोलिसांना नको तो नजारा दिसला. भलत्या वेळी अनपेक्षितपणे तीन पोलीस समोर ठाकल्याचे पाहून ‘त्या’ दोघांची बोबडी वळली.

खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना दणका नागपूर : शटर उचलून सरळ आतमध्ये शिरल्यानंतर पोलिसांना नको तो नजारा दिसला. भलत्या वेळी अनपेक्षितपणे तीन पोलीस समोर ठाकल्याचे पाहून ‘त्या’ दोघांची बोबडी वळली. कसेबसे स्वत:ला सावरत आपण प्रियकर प्रेयसी असून, लवकरच लग्न करणार आहोत, असे म्हणत त्यांनी पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांची केविलवाणी स्थिती पोलिसांमधील गुन्हेगारी जागृत करणारी ठरली. किशोरने राहुलची चांगलीच कानशेकणी केली. तरुण चांगल्या घरातला आणि तरुणी अभियांत्रिकीची विद्यार्थिनी असल्याचे कळताच त्यांना पोलीस ठाण्यात चलण्याचे फर्मान सोडले. बदनामीच्या धाकापोटी तरुणाने येथेच प्रकरण मिटवण्याची विनंती केली. तेव्हा पोलिसांनी त्याला भल्या मोठ्या रकमेची मागणी केली. त्यावेळी पोलिसांच्या हातात तरुणाने चार हजार रुपये ठेवले. नंतर बाकीचे देऊ म्हणून निघून जाण्याची विनंती केली. ती रक्कम घेऊन एका पोलिसाने पुन्हा त्या तरुणाची बेदम पिटाई केली आणि ‘बाकीच्या व्यवस्थेचे’ आदेश देत ते निघून गेले.(प्रतिनिधी) पाप झाकण्याचे आटोकाट प्रयत्न या प्रकरणात खरा दोषी किशोर गरवारे असल्याचे पोलीस ठाण्यातील कर्मचारी सांगतात. तो आधी डीबीत होता. पथक प्रमुखासह हिस्सेवाटणीवरून वाद झाल्यामुळे त्याला डीबीतून काढण्यात आले. मात्र, खबऱ्यांच्या नेटवर्कच्या भरवशावर त्याची वसुली सुरूच होती. त्याही दिवशी असेच झाले. खबऱ्याने या दोघांना बघितले आणि किशोर गरवारेला टीप दिली. किशोरने राजेश आणि सुनीलला एका ठिकाणी जायचे आहे असे म्हणत बोलवून घेतले. घटनास्थळी पोहचल्यावर तेथेही किशोरनेच तरुणाला मारहाण केली आणि त्याच्यासोबतच्या तरुणीवरही धाक जमवला. पैसेही त्यानेच घेतले. मात्र, त्याचा विरोध करण्याऐवजी राजेश आणि सुनीलही बघ्याच्या भूमिकेत उभे राहिले. त्याचमुळे हे प्रकरण त्यांच्यावरही शेकले. विशेष म्हणजे, या प्रकाराचा बोभाटा ठाण्यात त्याच दिवशी झाला. मात्र, एका अधिकाऱ्याने पोलिसांचे हे पाप झाकण्यासाठी ‘कुणीही बाहेर वाच्यता केल्यास गंभीर परिणाम होतील’, असा इशारा दिला. हे प्रकरण प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. आज या प्रकरणाची उपराजधानीत सकाळपासूनच जोरदार चर्चा होती. प्रकरण पोहचले आयुक्तालयातप्रेयसीसमोर प्रचंड अपमान झाल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांचा सल्ला घेऊन सरळ पोलीस आयुक्तालय गाठले. सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांच्याकडे झालेल्या प्रकाराची माहिती सांगितली. सहआयुक्तांनी उपायुक्त ईशू सिंधू यांच्याकडे चौकशी सोपवली. सिंधू यांनी चौकशी केल्यानंतर उपरोक्त घटना खरी असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी ३१ डिसेंबरला वरिष्ठांना अहवाल दिला. त्यानंतर किशोर गरवारे तसेच राजेश चिमोटे या दोघांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले तर सुनील टोपीला मुख्यालयात पाठविण्यात आले.