शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी दिल्ली-नागपूर विमानांच्या उड्डाणांवर होणार परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 21:06 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी जवळपास दोन तास विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १२.१० पर्यंत एरोस्पेस प्रतिबंधामुळे दिल्लीहून रवाना होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अनेक उड्डाणांच्या वेळेत बदल होऊ शकतो. यामध्ये दिल्लीहून नागपुरात येणाऱ्या दोन विमानांचा समावेश आहे.

ठळक मुद्देएरोस्पेस प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी जवळपास दोन तास विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १२.१० पर्यंत एरोस्पेस प्रतिबंधामुळे दिल्लीहून रवाना होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अनेक उड्डाणांच्या वेळेत बदल होऊ शकतो. यामध्ये दिल्लीहून नागपुरात येणाऱ्या दोन विमानांचा समावेश आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे वायुसेनेच्या विमानांचा हवाई अभ्यास सुरू आहे. याच कारणामुळे एरोस्पेसचा उपयोग काही तासांसाठी प्रतिबंधित ठेवण्यात येत आहे. बुधवारी दुपारी इंडिगोचे ६ई१३५ दिल्ली-नागपूर विमान १.१६ तास उशिराने दुपारी १२.१० ऐवजी १.२६ वाजता नागपुरात पोहोचले. तर इंडिगो एअरलाईन्सच्या स्थानिक स्टेशन मॅनेजर कार्यालयातर्फे सांगण्यात आले की, आम्हाला एरोस्पेस प्रतिबंधाची काहीही माहिती नाही. दिल्लीहून नागपुरात सकाळी ९.४० वाजता उड्डाण भरणाऱ्या विमानाला प्रजासत्ताक दिनामुळे उशीर होऊ शकतो. अन्य विमान कंपन्यांनी एरोस्पेस क्लोझरसंदर्भात प्रवाशांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.अन्य उड्डाणांना उशीरबुधवारी इंडिगोचे ६ई८१६ कोची-नागपूर विमान २.२६ तास उशिराने अर्थात सकाळी १०.५० ऐवजी दुपारी १.१६ वाजता नागपुरात आले. ६ई१३४ पुणे-नागपूर ४१ मिनिटे उशिराने दुपारी १.११ वाजता पोहोचले. तसेच जी८-८१२ बेंगळुरू-नागपूर ४९ मिनिटे उशिराने रात्री जवळपास १.३० वाजता आले.

टॅग्स :IndigoइंडिगोRepublic Dayप्रजासत्ताक दिन