शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार  : वर्षभरापासून शरीरसंबंध, लग्नास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:05 IST

वयाने ११ वर्षे लहान असलेल्या प्रियकराने वर्षभर शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याने त्याच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देअंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाने ११ वर्षे लहान असलेल्या प्रियकराने वर्षभर शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याने त्याच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली. संदीप रमेश वाघमारे (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तो अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.आरोपी संदीप आणि पीडित महिला (वय ३६) एकाच वस्तीत राहतात. त्यांच्यात दोन वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचे प्रेमसंबंधात रुपांतर झाल्यानंतर ५ जानेवारी २०१७ पासून ते एकमेकांशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. वर्षभरात वारंवार शरीरसंबंध जोडताना त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. अलीकडे मात्र तो तिला टाळू लागला. त्याचे दुसरीकडे सूत जुळल्याने तो टाळत असल्याचे लक्षात आल्याने महिलेसोबत त्याचा १७ मार्चला वाद झाला. त्याने यावेळी लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे महिलेने अंबाझरी ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संदीप वाघमारेला अटक केली.शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद वर्तनवस्तीतील ११ वर्षीय शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद वर्तन करणारा आरोपी दीपक गोकुल मिश्रा (वय २९) याच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. पीडित मुलीने पालकांना आणि पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती शाळेत जात-येत असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. त्याने बुधवारी सकाळी १०.३० ते ११ वाजता दरम्यान तिच्या शाळेसमोर उभे राहून अश्लील हातवारे करून तिचा पाठलाग केला. तिने विरोध केला असता त्याने तिला धमकी दिली. तिने आधी पालकांना आणि नंतर हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आरोपी दीपक मिश्राविरुद्ध विनयभंग करून धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार