शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:28 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन हे ते दोन उपायुक्त होय.

ठळक मुद्देरोशन यांना परिमंडळ चार तर भरणेंकडे वाहतुकीचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन हे ते दोन उपायुक्त होय.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाने राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी भरणे आणि रोशन यांची अंतर्गत बदली केली.भरणे सध्या परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त आहेत. यापूर्वी ते विशेष शाखेत असताना त्यांनी पासपोर्ट इमिग्रेशनच्या संबंधाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. पासपोर्टबाबतची संबंधित व्यक्तीची पडताळणी अवघ्या २४ तासात पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी भरणे यांनी बजावली. यातून पोलीस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली अनेक दिवस विनाकारण तिष्ठत ठेवण्याच्या प्रक्रियेला फाटा देण्यात त्यांनी यश मिळवले. पोलीस पडताळणीची प्रक्रिया अवघ्या २४ तासात पूर्ण करणारे नागपूर शहर देशात पहिले ठरले आहे. दुसरे म्हणजे, परिमंडळ चारमधील रेतीमाफिया आणि अवैध धंदेवाल्यांवर अंकुश ठेवण्यातही त्यांनी यश मिळवले. अशाच प्रकारे नंदनवनमधील पाच जणांचे हत्याकांड तसेच अडीच कोटींच्या हवालाकांडाचा पर्दाफाश करण्याचीही कामगिरी उपायुक्त भरणे यांनी बजावली होती. अलीकडे शहरातील वाहतूक पोलिसांवर होणाºया हल्ल्याच्या घटना तसेच शहरातील बेशिस्त वाहतूक आणि ऑटोवाल्यांना लगाम घालण्यासाठी त्यांना वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.अशाच प्रकारे वाहतूक शाखेचे उपायुक्त राजतिलक रोशन यांना परिमंडळ चारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एक अभ्यासू, हसतमुख आणि सौजन्यशील अधिकारी म्हणून तिलक यांनी ओळख निर्माण केली आहे. शहरातील विस्कळीत वाहतूक तसेच वाहतूक शाखेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला नियंत्रित करण्यासाठी रोशन यांनी विशेष परिश्रम घेतले. कर्तव्याऐवजी वसुलीला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांना वठणीवर आणण्याचेही त्यांनी बरेच प्रयत्न केले. आता त्यांच्याकडे परिमंडळातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांना सरळ करण्याची जबाबदारी आली आहे.पवार ठाण्याला तर जाधव यवतमाळलादोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्याही (ठाणेदार) बदल्या झाल्या आहेत. वाडीचे ठाणेदार नरेंद्र पवार यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात बदली झाली तर, तहसीलचे ठाणेदार वैभव जाधव यांची बदली यवतमाळला झाली आहे.

 

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयTransferबदली