शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

जनआंदोलनाच्या फेरमांडणीवर खल

By admin | Updated: June 29, 2014 00:39 IST

जनआंदोलनाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू शकतात यावर विश्वास व्यक्त करतानाच बदलत्या काळात या आंदोलनाची फेरमांडणी करण्याची गरज जनआंदोलनात सहभागी विविध

शेतकरी केंद्रबिंदू : पाच राज्यातील प्रतिनिधींचा समावेशनागपूर : जनआंदोलनाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू शकतात यावर विश्वास व्यक्त करतानाच बदलत्या काळात या आंदोलनाची फेरमांडणी करण्याची गरज जनआंदोलनात सहभागी विविध राज्यातील प्रतिनिधींनी व्यक्त केली. जनआंदोलन करणाऱ्या विविध संघटनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.‘लोकविद्या जनआंदोलन’ या संघटनेतर्फे शनिवारपासून येथील विनोबा विचार केंद्रात जनआंदोलन कार्यकर्त्यांची बैठक सुरू झाली. यावेळी प्रामुख्याने शेतकरी नेते विजय जावंधिया, सुनील सहस्रबुद्धे, रूपाताई कुळकर्णी, श्रीनिवास खांदेवाले, मोहन हिराबाई हिरालाल, धनाजीराव गुरव, मोहन राव, जी.नारायणराव, चित्रा सहस्रबुद्धे, विलास भोंगाडे, अमिताभ पावडे व महाराष्ट्रातील प्रमुख जनआंदोलकांसह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या बैठकीत पहिल्या दिवशी जनआंदोलनाची दिशा, बदलते स्वरूप आणि लोकविद्या या प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या संपूर्ण चर्चेत शेतकरी आणि त्याचे प्रश्न केंद्रबिंदू होते. जनआंदोलनाचे पारंपरिक मुद्दे सोडून नवीन मुद्यांवर आधारित आंदोलनाची फेरमांडणी करावी लागेल, असा मतप्रवाह या बैठकीत व्यक्त करण्यात आला. इतरही विषय चर्चेला आले. सर्वसामान्यांच्या अंगभूत असलेल्या गुणांवर आधारित अर्थव्यवस्था व त्यासंदर्भातील राजकारण तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यावर वक्त्यांनी भर दिला.शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले, शेतकऱ्याला शेती कशी करावी हे सांगावे लागत नाही. मात्र त्यांच्या अंगी असलेल्या या ज्ञानाकडे कुणाचेच लक्ष नाही, त्यांच्या प्रश्नांबाबतही सरकार गंभीर नाही, त्यामुळे त्याची दैनावस्था झाली आहे. जनआंदोलन करणाऱ्या संघटनांनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरावा.सुनील सहस्त्रबुद्धे यांनी लोकविद्या आणि राजकारणाचे बदलते स्वरूप यावर विवेचन केले. अलीकडच्या काळात एका विशिष्ट गटाला डोळ्यापुढे ठेवून राजकारण केले जाते. यात शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी, दलितांच्या प्रश्नांना स्थान नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उत्पन्नाच्या स्रोताचे समान वाटप यावर त्यांनी भर दिला. रूपाताई कुळकर्णी यांनी लोकविद्येचं व्यासपीठ असावे अशी कल्पना मांडली. अमिताभ पावडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. देशात एक टक्का उद्योजक राजकारणावर प्रभाव ठेवून आहेत. मात्र शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के असताना केवळ ते संघटित नसल्याने त्यांचे प्रश्न दुर्लक्षित आहे. जनआंदोलकांनी या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे पावडे म्हणाले. रविवारीही ही बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)