शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:32 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर- नागपुरातील कामठी रोड गुरुद्वाराजवळ असलेल्या रेल्वे पुलाच्या डाऊन लाईनचे स्टील गर्डर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे मध्य रेल्वेचे नागपूर हे मोठे व मह्त्त्वाचे जंक्शन असून येथून दररोज शेकडो गाड्या धावतात.ज्या पुलावर ही फट पडली आहे त्या पुलावरून उत्तरेकडे जाणाऱ्या  गाड्यांचा वाहता ...

ठळक मुद्देतपासणीदरम्यान पुलाला आढळली होती दोन इंचाची फट

आॅनलाईन लोकमतनागपूर- नागपुरातील कामठी रोड गुरुद्वाराजवळ असलेल्या रेल्वे पुलाच्या डाऊन लाईनचे स्टील गर्डर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे मध्य रेल्वेचे नागपूर हे मोठे व मह्त्त्वाचे जंक्शन असून येथून दररोज शेकडो गाड्या धावतात.ज्या पुलावर ही फट पडली आहे त्या पुलावरून उत्तरेकडे जाणाऱ्या  गाड्यांचा वाहता ओघ असतो. तसेच या पुलाखाली एक मोठा गुरुद्वारा असून तेथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. अशा परिस्थितीत या पुलाला दोन इंचाची फट पडण्याची गंभीर बाब रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने संभाव्य अनेक धोके टळल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.शनिवार दुपारपासूनच पुलाखालील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाला कठड्याचा आधार दिला गेला असून, २ इंचाची फट ज्या ठिकाणी आली आहे ती दुरुस्त करून पुढील २ दिवस त्याच्या देखरेखीचे काम केले जाणार आहे.या कामाच्या पाहणीसाठी मुंबई मध्य रेल्वेचे काही अधिकारीही येथे दाखल होणार आहेत. सध्या नागपूर-इटारसी डाऊन लाईनवरील वाहतूकही वळविण्यात आली आहे. नागपूर स्टेशन ते गोधनी स्टेशनदरम्यान सिंगल लाईन राहणार असल्याने इटारसी लाईनच्या गाड्या विलंबाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात