शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गड्डीगोदाम रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:25 IST

कामठी रोडवर गुरुद्वाराजवळ गड्डीगोदाम रेल्वे पुलाला भेग (क्रॅक) पडल्याची बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे.

ठळक मुद्देसंथगती चालल्या गाड्या : कामठी रोडची वाहतूक बंद, वाहनचालकांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी रोडवर गुरुद्वाराजवळ गड्डीगोदाम रेल्वे पुलाला भेग (क्रॅक) पडल्याची बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे. दुरुस्तीचे काम दुसºया दिवशीही सुरू होते. त्यामुळे डाऊन लाईनवर चालणाºया गाड्यांना कॉशन आॅर्डर म्हणजे संथगतीने चालविण्यात आले. मात्र पुलाखालून कामठी रोडची वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे प्रबंधक ब्रिजेशकुमार गुप्ता यांच्या निरीक्षणाखाली वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) यांच्या नेतृत्वात अभियांत्रिकी विभागाचे १५० कर्मचारी व कामगार सकाळपासून दुरुस्तीच्या कामात लागले होते. पुलाच्या भेग पडलेल्या भागासह रेल्वे रुळाला स्लीपरशी जोडणाºया लोखंडाच्या चावीलाही वेल्डिंग करण्यात आले. तुटलेल्या काँक्रिट स्ट्रक्चरची डागडुजी करण्यात आली. मनमाड येथून तयार करून आणलेले लोखंडाचे माठे गर्डर गड्डीगोदाम पुलाच्या परिसरात ठेवण्यात आले. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुलाला लोखंडाच्या स्ट्रक्चरद्वारा सपोर्ट देण्यात आला आहे.या सर्व कामादरम्यान पुलावरून जाणाºया अप आणि डाऊन लाईनच्या गाड्यांना कॉशन आॅर्डरवर चालविण्यात आले. याअंतर्गत गाड्यांचा वेग २५ किमी/तास यापेक्षा अधिक नसतो. यामध्ये लोखंड लादून असलेली मालगाडी नागपूरहून कळमेश्वरला आणि व्हेईकल आॅईल असलेली मालगाडी याच पुलावरून बुटीबोरीला रवाना करण्यात आली. पहिल्या दिवशी सहापेक्षा जास्त गाड्यांना डाऊन लाईनवरूनच चालविणे शक्य झाले होते.डीआरएम ब्रिजेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, गड्डीगोदाम पुलाचा क्षतिग्रस्त भाग लोखंडाच्या गर्डरने जोडण्यात येईल. मनमाडहून हे गर्डर आणून या परिसरात ठेवण्यात आले आहेत. एका ट्रॅकसाठी दोन गर्डरची आवश्यकता होती. हे गर्डर पुलावर चढवून जोडण्यात येतील. दुरुस्तीच्या कामादरम्यान अप आणि डाऊन लाईनची वाहतूक सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जनतेने सहकार्य करावे : डीआरएममंडळ रेल्वे प्रबंधक ब्रिजेश कुमार गुप्ता यांनी सांगितले, गड्डीगोदाम रेल्वे पुलाच्या दुरुस्ती कामामुळे कामठी रोडची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मार्गावरील वाहनचालकांना त्रास होत असल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. रेल्वे प्रवासी आणि पुलाखालच्या मार्गाने जाणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुलाच्या दुरुस्तीचे काम आवश्यक होते. दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असून, जनतेकडून सहकार्याचे आवाहन त्यांनी केले.