शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

डीपीचे दार दुरुस्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:33 IST

शहरातील विद्युत पुरवठा करणाºया डीपीचे खुले दार धोकादायक ठरू शकतात, या आशयाच्या छायाचित्रासह वृत्त लोकमतने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले.

ठळक मुद्देएसएनडीएलने मागितला ७२ तासांचा अवधी : महावितरणनेही घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विद्युत पुरवठा करणाºया डीपीचे खुले दार धोकादायक ठरू शकतात, या आशयाच्या छायाचित्रासह वृत्त लोकमतने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत, शहराला विद्युत पुरवठा करणारी एसएनडीएल व महावितरण कंपनीने तात्काळ दखल घेतली असून, एनएनडीएलने ७२ तासात डीपीचे दार दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. तर महावितरण सुद्धा त्याच्या कक्षेतील उघड्या डीपी दुरुस्त करणार असून, शिवाय एनएनडीएलला कारवाईचा अहवाल मागविणार असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.शहरातील अनेक भागातील उघड्या डीपी, डीपीचे तुटलेले दार, विद्युत तारांवर लटकलेले केबलचे वायर, विद्युत खांबाला बांधलेले केबल आहे. विद्युत पुरवठ्याची ही व्यवस्था धोकादायक असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. यासंदर्भात एसएनडीएलचे जनसंपर्क अधिकारी दीपांशू खिरवाडकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, उघड्या पडलेल्या डीपी किंवा डीपीचे तुटलेले दार हा प्रकार भुरट्या चोरांचा आहे. परिसरातील नागरिकांकडूनही डीपीतून वीजचोरी होत असल्याने ते उघड्या डीपी ठेवतात. ज्या डीपी उघड्या आहेत, त्यांना ताबडतोब बंद करण्यात येईल. तसेच ज्या डीपीचे दार तुटलेले आहे, तेही येत्या ७२ तासांमध्ये बदलविण्यात येईल.यासंदर्भात महावितरण काय उपाययोजना करते, यासाठी त्यांच्या अधिकाºयांना विचारणा केली असता ते म्हणाले की, यात महावितरणच्या हद्दीत असलेल्या केवळ एकाच ठिकाणचे छायाचित्र आहे. या कामाचे वर्क आॅर्डर झालेले आहे. परंतु ठेकेदाराने ते काम केलेले नाही. लवकरात लवकर ते काम करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देण्यात येईल. तसेच इतर भागातील जे छायाचित्र आहे ते एनएनडीएलच्या हद्दीतील आहे. त्यामुळे एसएनडीएलला आम्ही पत्र पाठवून त्यांच्याकडून कामाचा अहवाल मागवू.नागरिकांसाठी हेल्पलाईनविद्युत डीपीच्या दाराची चोरी होण्याचे प्रकार थांबविण्यासाठी किंवा वीज पुरवठ्यासंदर्भातील काही समस्या असतील, यासाठी एसएनडीएलने हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांना ७५०७७७४६११ हा व्हॉटस्अ‍ॅप नंबर दिला आहे. त्यांनी समस्यांचे फोटो यावर टाकल्यास ताबडतोब आम्ही कारवाई करू. प्रत्येक डीपीवर आम्ही लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनीच सुरक्षेसंदर्भात पुढाकार घेतल्यास, या अडचणी बºयापैकी संपविता येईल, असेही एसएनडीएलच्या जनसंपर्क अधिकाºयानी सांगितले.