शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण काँग्रेसचा एकसूर ‘प्रदेश’साठी गटबाजी दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:36 IST

अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया रखडली असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मात्र एकोप्याने आपली गाडी मुंबईपर्यंत पोहचवली आहे.

ठळक मुद्देवासनिक, गावंडे, चौकसे, भोयर, राऊत, पठाण प्रदेशवर

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया रखडली असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मात्र एकोप्याने आपली गाडी मुंबईपर्यंत पोहचवली आहे. ग्रामीणमधून १५ नेत्यांना प्रदेश प्रतिनिधी म्हणून प्रदेश काँग्रेसवर पाठविण्यात आले आहे.माजी मंत्री मुकुल वासनिक हे कामठी शहर ब्लॉक मधून तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर हे कामठी ग्रामीणमधून प्रदेशवर गेले आहेत. काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांना काटोलमधून तर आमदार एस.क्यु. जमा यांना उमरेड मधून संधी मिळाली आहे. महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष शांताताई कुमरे यांना रामटेकमधून संधी देण्यात आली आहे तर रामटेक विधानसभेत काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे यांना उमरेड ग्रामीण मधून संधी देण्यात आली आहे. त्यांची प्रदेशवर जाण्याची ही सलग चवथी टर्म आहे.युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत यांना गेल्यावेळी प्रदेशवर प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यावेळी त्यांना हिंगणा ब्लॉकमधून संधी मिळाली आहे. याशिवाय आमदार सुनील केदार (सावनेर), प्रदेश सचिव नाना गावंडे (नागपूर ग्रामीण ), बाबुराव तिडके (मौदा), महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तक्षशिला वाघधरे (नरखेड), मुजीब पठाण (कुही) यांनाही प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले आहे. ग्रामीण काँग्रेसची ही यादी पाहता भविष्यात वाद होऊ नयेत म्हणून सर्वच गटांना संधी देण्यात आल्याचे दिसते. सोबतच एकाच ब्लॉकमध्ये दोन नावे समोर आल्यावर दुसºयाला दुसºया तालुक्यातून सामावून घेण्यात आले आहे.काँग्रेस पक्ष आव्हानात्मक परिस्थितीत आहे. त्यामुळे काँग्रेस एकजूट करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. आम्ही ग्रामीणमध्ये तेच केले, असे मुळक यांनी सांगितले.ग्रामीणची पक्षशिस्त शहरासाठी आरसामाजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणच्या नेत्यांनी आपसात मतभेद होऊ न देता एकमताने प्रदेश काँग्रेसवर जाण्याचा सर्वांचा मार्ग सुकर केला. ग्रामीण काँग्रेसने दाखविलेली ही पक्षशिस्त नागपूर शहरातील गटबाजी नेत्यांसाठी आरसा आहे. ग्रामीणमध्ये सामोपचाराने निर्णय होऊ शकतो तर शहरात का नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.