शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर प्रदूषणास कारणीभूत झोपडपट्टी हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 19:50 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेली झोपडपट्टी हटविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नगर परिषदेला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : सरकारने बांधून दिलेल्या घरात जाण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेली झोपडपट्टी हटविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नगर परिषदेला दिला.ही झोपडपट्टी सरकारी जमिनीवर वसली आहे. झोपडपट्टीतील सांडपाणी लोणार सरोवरात मिसळत होते. त्यामुळे लोणार सरोवर प्रदूषित झाले. न्यायालयाच्या निर्देशानंतर या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच, झोपडपट्टीवासीयांना नवीन घरे बांधून देण्यात आली आहेत. परंतु, झोपडपट्टीवासी कुटुंबे वाढल्यामुळे एकापेक्षा जास्त किंवा अधिक मोठ्या घरांची मागणी करीत आहेत. परिणामी, ते नवीन घरांत स्थानांतरित झालेले नाहीत. नगर परिषदेने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने प्रशासन व झोपडपट्टीवासीयांना खडेबोल सुनावून कायदेशीर मार्गाने झोपडपट्टी हटविण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार, नगर परिषदेस झोपडपट्टीवासीयांना नोटीस बजावून एक आठवड्यात जागा रिकामी करण्याचे निर्देश द्यायचे आहेत. झोपडपट्टीवासीयांनी एक आठवड्यात जागा रिकामी न केल्यास पुढील दोन आठवड्यांत पोलीस संरक्षण मिळवून झोपडपट्टी हटवायची आहे. तसेच, त्यानंतर तीन आठवड्यांमध्ये न्यायालयात कारवाईचा अहवाल सादर करायचा आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. लोणार सरोवर संवर्धनासाठी अ‍ॅड़ कीर्ती निपाणकर (नागपूर), गोविंद खेकाळे व सुधाकर बुगदाने (दोन्ही बुलडाणा) यांनी २००९ मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे़ दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे लोणार सरोवर संवर्धनासाठी अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. या प्रकरणात अ‍ॅड़ आनंद परचुरे न्यायालय मित्र आहेत.

 

टॅग्स :LonarलोणारHigh Courtउच्च न्यायालय