शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पातील प्रलंबित भूसंपादन प्रकरणे निकाली काढा : सुनील देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:37 IST

गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तात्काळ खरेदीला सुरुवात करा. तसेच गावपातळीवर महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आवश्यक असलेली जमीन कालबद्ध कार्यक्रमानुसार अधिग्रहित करण्याच्या सूचना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी सोमवारी दिल्या.

ठळक मुद्देभूसंपादनासाठी गावस्तरावर मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तात्काळ खरेदीला सुरुवात करा. तसेच गावपातळीवर महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आवश्यक असलेली जमीन कालबद्ध कार्यक्रमानुसार अधिग्रहित करण्याच्या सूचना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी सोमवारी दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गोसेखुर्द प्रकल्पातील भूसंपादनामुळे प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख व विभागीय आयुक्त अश्विन मुदगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गोसेखुर्द प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासंदर्भात जिल्हानिहाय कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला असून, जिल्हाधिकारी यांनी त्यानुसार भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच दर महिन्याला सर्व यंत्रणांकडून आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त अश्विन मुदगल यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी (भंडारा) शंतनू गोयल, कुणाल खेमनार (चंद्रपूर), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता अ. रा. कांबळे, अधीक्षक अभियंता जी. एम. शेख, वन जमाबंदी अधिकारी एस. एच. टोणगावकर, उपायुक्त श्रीकांत फडके, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे तसेच जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता व महसूल विभागाचे भूसंपादन अधिकारी उपस्थित होते.गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही केवळ कालवे व वितरिकांच्या कामांसाठी आवश्यक असलेली जमिन भूसंपादन प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना थेट सिंचनाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आवश्यक असलेली जमीन थेट खरेदी करावी. तसेच भूसंपादन अधिनियमानुसार अधिग्रहित करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

टॅग्स :Sunil Deshmukhसुनील देशमुखGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प