विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असो.चे आवाहन : कंपनीचे पंप सुरू राहणारनागपूर : शहरात पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करून नागरिकांना फायदा पोहोचविण्याच्या उद्देशाने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने उद्या, सोमवारी पेट्रोल पंप बंदचे आवाहन केले आहे. यादिवशी शहरातील १०० पेक्षा जास्त पंप बंद राहतील, पण कंपनीचे पंप सुरू राहणार आहेत. ... तर पेट्रोल ३ रुपयांनी स्वस्त होणार!‘फामपेड’ ही राज्यव्यापी पेट्रोलपंप चालकाची संघटना राज्यातील मनपा क्षेत्रातील पेट्रोल व डिझेलवर आकारण्यात येणारा एलबीटी रद्द करण्यासाठी शासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. शासनाने ५० कोटींपर्यंत उलाढाल असलेल्यांचा एलबीटी रद्द केला, पण ५० कोटींवरील व्यापाऱ्यांवर एलबीटी आकारणी सुरू ठेवली.
एलबीटी हटविण्यासाठी पेट्रोल पंप उद्या बंद
By admin | Updated: September 6, 2015 02:41 IST