शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना मंत्रीमंडळातून काढा; अंबादास दानवेंची परिषदेत मागणी

By योगेश पांडे | Updated: December 15, 2023 21:00 IST

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात अत्यंत खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील चर्चेत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली व मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री मंत्रिमंडळात एक भूमिका मांडतात आणि काही त्यांचे मंत्री विविध ठिकाणी सभा घेतात. मंत्रीमंडळापेक्षा वेगळी भूमिका मांडून ते एका समाजाचे मसीहा आहेत अशी प्रतिमा निर्माण करतात. मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात अत्यंत खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे व ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागायला नको याबाबत मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. मराठा समाजाला आरक्षणा देण्यापेक्षा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आरक्षण कसे दिले हेच दाखविण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी भाषण केली. जर आरक्षण दिले होते तर ते कुठे गेले हे कुणीही का स्पष्टपणे बोलले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजातील तरुणांच्या हितासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. मात्र या महामंडळाची एकही फाईल बँक मंजूर सुद्धा करत नाही, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. आईकडील जातीच प्रमाणपत्रही मुलांना लागू करावं, अशी मागणी दानवे लावून धरली.

हलबा समाजालादेखील आरक्षण द्या

आ.प्रवीण दटके यांनी मराठा समाजाला आरक्षण आवश्यक असल्याची भूमिका मांडली. मात्र विदर्भात हलबा समाजदेखील मोठ्या प्रमाणात आहे. या समाजालादेखील आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAmbadas Danweyअंबादास दानवे