शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ व वडेट्टीवार यांना पदावरून हटवा; अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

By गणेश हुड | Updated: June 24, 2024 19:14 IST

नागपूर येथे रविवारी अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळाला भेट देवून मराठा समाजाविरोधात चिथावणी देणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पदावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

नागपूर येथे रविवारी अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत विविध ठराव घेण्यात आले. यात राज्यात मराठा विरुध्द ओबीसी असा विनाकारण वाद निर्माण होऊनये, यासाठी खबरदारी घ्यावी, मराठा समाजाविरोधात चिथावणी देणारे भुजबळ व वडेट्टीवार यांना पदावरुन हटविण्यात यावे, केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करावी, यासह इतर ठराव पारीत करण्यात आल्याची माहिती संभाजीराजे दहातोंडे यांनी दिली. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे आदी उपस्थित होते.

सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना उच्च शिक्षणासाठी मदत झाली. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना उद्योग सुरू करण्याला मदत झाल्याची माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

घटना दुरुस्तीशिवाय आरक्षण अशक्यराज्य विधिमंडळाने मराठा आरक्षणाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवावा, त्यानुसार केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करावी. अशी महासंघाची मागणी आहे. घटना दुरुस्तीशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण न टिकणारे आहे. नवी दिल्ली येथे मराठा महासंघाने आरक्षणासाठी गत काळात आंदोलन केले होते. मात्र याची दखल केंद्र सरकारने घेतली नाही. अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघ