शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर काळाबाजाराचे खटले रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:07 IST

राकेश घानोडे नागपूर : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराचे १३ खटले लॉकडाऊन व अन्य विविध तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत. मुंबई उच्च ...

राकेश घानोडे

नागपूर : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराचे १३ खटले लॉकडाऊन व अन्य विविध तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, यापैकी पहिले आठ खटले ३१ मेपर्यंत निकाली काढायचे होते. परंतु, वर्तमान परिस्थिती पाहता या आदेशाचे पालन होणे अशक्य आहे. या खटल्यांमध्ये अद्याप आरोपच निश्चित झालेले नाहीत.

कायद्यानुसार १३ पैकी १२ खटले सत्र न्यायालयात, तर एक खटला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात चालवला जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पहिल्या आठ खटल्यांमध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी अनुभवी महिला वकील अ‍ॅड. ज्योती वजानी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य पाच खटले त्यांच्याकडे सोपविण्यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. ते खटले अ‍ॅड. वजानी यांच्याकडे न दिले गेल्यास त्यात सरकारच्या वतीने नियमित सरकारी वकील काम पाहतील. उच्च न्यायालयाने रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराची गंभीर दखल घेऊन या प्रकरणांचा तपास व खटले शेवटाला पोहोचविण्याच्या उद्देशाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली होती. तसेच, ती याचिका निकाली काढताना गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून आठ खटले ३१ मेपर्यंत निकाली काढण्याचा आदेश दिला होता. परंतु, विविध कारणांमुळे या आदेशाची अंमलबजावणी होणे अशक्य आहे. करिता, खटले निकाली काढण्यासाठी मुदत वाढवून दिली जाऊ शकते.

-------------

सीसीटीव्ही फुटेजचा अहवाल प्रलंबित

काही खटल्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे आहेत. सत्यता तपासण्यासाठी ते फुटेज मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवालही प्रलंबित आहे.