शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाचा दिलासा दोन हजार कोटीसाठी अडकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 22:36 IST

लॉकडाऊनच्या काळातील भरभक्कम वीज बिलापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. नागरिकांनाही त्याची प्रतीक्षा आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतरही यावर ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही.

ठळक मुद्दे राज्य सरकारची घोषणा कधी पूर्ण होणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरही निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळातील भरभक्कम वीजबिलापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. नागरिकांनाही त्याची प्रतीक्षा आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतरही यावर ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही. दिलासा देण्यासाठी वीज कंपन्यांनी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तिजोरी उघडली तरच सामान्य नागरिकांना वीज बिलातून दिलासा मिळेल, हे स्पष्ट आहे. तेव्हा सध्यातरी वीज बिलाचा दिलासा हा दोन हजार कोटी रुपयांसाठी अडकून आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जामंत्री व वीज अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अशी घोषणा केली होती की, राज्य सरकार लॉकडाऊन काळात एकाचवेळी आलेल्या वीज बिलापासून नागरिकांना दिलासा देण्यावर विचार करीत आहे. ऊर्जामंत्री राऊत यांनीही सरकार नागरिकांच्या मदतीसाठी कटीबद्ध असल्याचे जाहीर केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार होता. परंतु पाच आठवड्यानंतरही राज्य सरकार यावर निर्णय घेऊ शकलेले नाही.सूत्रानुसार घोडे निधीसाठी अडकले आहे. वीज कंपन्यांनी जो प्रस्ताव पाठवला आहे त्यानुसार १८०० ते २००० कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या निधीमुळे राज्य सरकार दुविधेत आहे. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, यासंदर्भात सरकारलाच निर्णय घ्यायचा आहे. सरकारने निधी दिला तरच वीज बिलांमध्ये दिलासा दिला जाऊ शकतो. ऊर्जा मंत्रालयातील सूत्रानुसार मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वीही दिलासा देण्याची घोषणा नाकारण्यात आलेली नाही.१०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ होऊ शकतेराज्य सरकारने दिलासा देण्याची घोषणा केली. तो दिलासा नेमका काय असेल याबाबत असे सांगितले जाते की, यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ होऊ शकते. १०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर ५० टक्के आणि ३०१ पेक्षा अधिक वापराच्या युनिटवर २५ टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. दुसºया एका प्रस्तावात १०० युनिटपर्यंतचे वीज बील माफ करणे आणि एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन दरावर सध्या रोख लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.असा मिळणार होता दिलासाराज्य सरकारने वीज बिलात दिलासा देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात काही शिफारस करण्यात आली होती. यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणे, १०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर ५० टक्के आणि ३०१ पेक्षा अधिक वापराच्या युनिटवर २५ टक्के सूट. तसेच एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन दरावर सध्या रोख लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु आता हा प्रस्तावच थंडबस्त्यात टाकण्यात आला आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल