आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करीत सात जन्म हाच पती मिळावा म्हणून महिलांनी आज वडाच्या झाडाचे पूजन केले. घरातील देवाचे पूजन करून शहरात महिलांनी वडाच्या झाडाचे मनोभावे पूजन केले. सावित्रीने तिच्या पतीचे प्राण वडाच्या झाडाखालीच यमराजाकडून मिळविले, अशी आख्यायिका आहे. पण वडाचे झाड भरपूर प्राणवायू देणारे असल्याने महिलांच्या आरोग्यासाठीही त्याचा सकारात्मक उपयोग असल्याची वैज्ञानिक मान्यता आहे. श्रद्धा आणि निसर्गपूजनाचाच हा सोहळा शहरात महिलांनी नटून-थटून साजरा केला.
नाते साताजन्माचे :
By admin | Updated: June 3, 2015 02:45 IST