शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संघ स्मृतिमंदिरात ‘इफ्तार’ला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:13 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. एकीकडे सामाजिक समरसतेचे सूत्र घेऊन देशभरात कार्यविस्तार सुरू असताना ‘इफ्तार’ला नकार देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकशी वाढणार समरसता? : मुस्लीम राष्ट्रीय मंचची विनंती फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत मुस्लीम राष्ट्रीय मंचकडून ‘रमजान’च्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. संघ स्मृतिमंदिर परिसरातदेखील ‘इफ्तार’चे आयोजन करण्याची विनंती मंचकडून करण्यात आली होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली. एकीकडे सामाजिक समरसतेचे सूत्र घेऊन देशभरात कार्यविस्तार सुरू असताना ‘इफ्तार’ला नकार देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.मुस्लीम समुदायाशी फारसे जुळवून घेत नाही, अशा पद्धतीचा सर्वसाधारण समज आहे. हा समज खोडून काढण्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे गेल्या काही काळापासून ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देशातील अनेक भागात संघाचे पदाधिकारीदेखील यात सहभागी होताना दिसून आले. अगदी नागपुरातदेखील मागील वर्षी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा कार्यक्रम संघ स्मृतिमंदिरात व्हावा, अशी मंचच्या पदाधिकाºयांची इच्छा होती. यामुळे जगभरात एकतेचा संदेश जाईल, ही त्यामागची भावना होती. मात्र संघ पदाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली.शहरात दोन ठिकाणी झाले आयोजनसंघ स्मृतिमंदिरात आयोजनाची विनंती नाकारण्यात आल्यानंतर मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे नागपुरात दोन ठिकाणी ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले. २४ मे रोजी बुद्धूखां मिनार, गांधीबाग येथे तर १ जून रोजी संजीवनीनगर कॉलनी, यशोधरानगर येथे हे आयोजन करण्यात आले. मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर, महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख, युवा प्रकोष्ट संयोजक दिवानशाद अली, नागपूर संयोजक रियाज अहमद खान, शाहिद खान, फरह वासीम हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते....तर गेला असता मजबूत संदेशयासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश संयोजक मोहम्मद फारुक शेख यांना संपर्क केला असता त्यांनी अशाप्रकारची विनंती केल्याचे मान्य केले. संघ स्मृतिमंदिरमध्ये कार्यक्रम झाला असता तर सामाजिक समरसतेचा संदेश जगामध्ये गेला असता. मात्र आम्ही ज्या पदाधिकाऱ्यांजवळ गेलो, त्यांनी आमच्या विनंतीचा विचार केला. मात्र आम्हाला परवानगी मिळू शकली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘इफ्तार’ला विरोध नाहीच. परंतु सद्यस्थितीत रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात संघाचा तृतीय वर्ष वर्ग सुरू आहे. त्यामुळे येथे ‘इफ्तार’चे आयोजन करणे शक्य झाले नसते. संघाचा असे मत एका संघ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRamzanरमजान