शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

१० जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: July 3, 2016 02:50 IST

नऊ हजार कोटी रुपयांच्या अवैध डब्बा व्यापारप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयाने शनिवारी १० आरोपींचा

अवैध डब्बा व्यापार: रवी अग्रवाल, वीणा सारडा यांचा समावेशनागपूर : नऊ हजार कोटी रुपयांच्या अवैध डब्बा व्यापारप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयाने शनिवारी १० आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. सचिन ठाकूरमल अग्रवाल (३६) रा. जीवनधारा अपार्टमेंट सतनामीनगर, विनय श्रीप्रकाश अग्रवाल रा. सूर्यनगर, अंकित ओमप्रकाश मालू रा. वाठोडा, रवी ओमप्रकाश अग्रवाल रा. हिवरीनगर, कन्हैया रामचंद्र थावरानी रा. गरोबा मैदान, वीणा घनश्याम सारडा रा. शिवाजीनगर, दिनेश चंदूलाल गोखलानी, दिनेश भवरलाल सारडा, उत्तम ऊर्फ गोपी द्वारकाप्रसाद मालू आणि जाकीर हुसैन शेख, अशी आरोपी व्यावसायिकांची नावे आहेत.आरोपी हे शेअर ब्रोकर व्यवसायातील आहेत. हे आरोपी सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या डीमॅट खात्यांतर्गत नोंदणी न झालेल्या ग्राहकांची ‘सौदा’ नावाच्या अवैध सॉफ्टवेअरमध्ये नोंद करीत होते. याच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कमोडिटीज आणि शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा नगदी स्वरूपात व्यवहार करीत होते. हा व्यवहार म्हणजेच डब्बा व्यापार होय. हे आरोपी पैशाच्या देवाण-घेवाणीचे सेटलमेंटही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज क्लिअरिंगच्या प्रस्तावित नियमांनुसार न करता परस्पर करून मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या महसुलापासून शासनाला वंचित ठेवत होते. या डब्बा व्यापारामुळे शासनाला कोट्यवधीच्या महसुलापासून वंचित व्हावे लागले आहे. आरोपींनी शासन, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज आणि सेबीची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे. सरकारतर्फे १३ मे २०१६ रोजी सीताबर्डी, लकडगंज आणि तहसील पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्यानंतर आरोपींविरुद्ध तिन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात यापूर्वी १३ जणांना अटक झालेली आहे. या १० आरोपींनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात वेगवेगळे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. प्रकरण गंभीर असल्याने आणि तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपींचे सर्व अर्ज फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाला सहाय्य म्हणून आरोपी वीणा सारडा प्रकरणात अ‍ॅड. अतुल पांडे, अ‍ॅड. आशिष किल्लेदार यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)