शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

रस्त्यावरील मानसिक रुग्णांचे पुनर्वसन आवश्यक : कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 8:05 PM

शहरात लॉकडाऊन असतानाही रस्त्याच्या कडेला व इतरही ठिकाणी घाणीने माखलेले, अर्धनग्न, केस विस्कटलेले स्वत:शीच बडबडत असलेले मानसिक रुग्ण दिसून येत आहेत. ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर यांनाही लागण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. यामुळे रस्त्यावरील मानसिकरीत्या आजारी बेघर रुग्णांची प्रादेशिक मनोरुग्णालयात तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निवेदन ‘ग्यात’ संस्थेतर्फे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व उपसंचालक आरोग्य विभागाला दिले आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालयात पुनर्वसनाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात लॉकडाऊन असतानाही रस्त्याच्या कडेला व इतरही ठिकाणी घाणीने माखलेले, अर्धनग्न, केस विस्कटलेले स्वत:शीच बडबडत असलेले मानसिक रुग्ण दिसून येत आहेत. ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर यांनाही लागण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. यामुळे रस्त्यावरील मानसिकरीत्या आजारी बेघर रुग्णांची प्रादेशिक मनोरुग्णालयात तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निवेदन ‘ग्यात’ संस्थेतर्फे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व उपसंचालक आरोग्य विभागाला दिले आहे.मानसिक रुग्णांना योग्य उपचार मिळाले तर ते बरे होऊ शकतात. परंतु याबाबत जागरूकता नसल्याने काही कुटुंबांसाठी अशा रुग्णांना सांभाळणे अवघड होते. परिणामी, त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. ग्यात संस्थेने शहरात फिरून अशा रुग्णांची माहिती घेऊन ती जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मनपा आयुक्तांना दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अशा रुग्णांना बेघर निवारा केंद्रात ठेवणे अयोग्य ठरेल. केंद्राच्या रोजच्या कार्यात अडथळा येण्याची व इतरांना त्रास होण्याची शक्यता आहे. येथे अशा रुग्णांना पाहण्याचे प्रशिक्षणप्राप्त कर्मचारी नसल्याने अडचणीचे जाईल. यामुळे ‘लॉकडाऊन’ असेपर्यंत यांचे तात्पुरते पुनवर्सन प्रादेशिक मनोरुग्णालयात करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, दुर्लक्ष करून त्यांना रस्त्यावरच सोडल्यास इतरांच्या तुलनेत त्यांना सर्वाधिक कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. शिवाय, आपली लक्षणे सांगता येणार नसल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळणेही कठीण आहे. या रुग्णांची तपासणी होण्याची शक्यता कमी असल्याने इतरांना लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे यांचे तातडीने पुनर्वसन होणे आवश्यक आहे. पुनर्वसनापूर्वी त्यांची तपासणी होणेही गरजेचे आहे. अशा रुग्णांना शोधून काढून त्यांची माहिती देण्यासाठी ग्यात संस्था मदत करेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या