उमरेड : तालुक्यात कोविड लसीचा तुटवडा असला तरी उमरेड ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यातील पाचगाव, सिर्सी, बेला आणि मकरधोकडा या प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या नियमितपणे लसीकरण सुरु राहणार आहे. तालुक्यातील अतिरिक्त लसीकरण केंद्र तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. लसीचे डोस जसजसे उपलब्ध होतील तसतसे नियोजन आखले जाईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, डॉ. निशांत नाईक यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरा डोस उपलब्ध झाल्यास अतिरिक्त केंद्र सुद्धा सुरू करण्याचे नियोजन असून उमरेड तालुक्यात अतिरिक्त लसीकरण केंद्राची संख्या ८ ते १० आहे. उमरेड तालुक्यात आतापर्यंत २६,२८१ जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. यामध्ये उमरेड ग्रामीण रुग्णालय (८,१७०), पाचगाव (८,१२४), बेला (३,५५६), सिर्सी (२,५१५) आणि मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर ३,९१६ जणांनी लसीकरण केले. तालुक्यात लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस एकूण २७,१८२ जणांना देण्यात आला.
नियमित लसीकरण सुरु, अतिरिक्त केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:09 IST