शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस-आयपीएस अधिकारी न झाल्याची खंत, FDA निरीक्षकाची नागपुरात आत्महत्या

By योगेश पांडे | Updated: November 28, 2023 16:41 IST

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची मनात सल असल्याने नैराश्यात अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने नागपुरात आत्महत्या केली. संबंधित तरुण अधिकारी परभणी येथील निवासी होता. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शुभम सिद्धार्थ कांबळे (२५, वर्मानगर, गंगाखेड, परभणी) असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ते नागपुरात मित्राला भेटण्यासाठी आले व सेंट्रल एव्हेन्यू येथील हॉटेल राजहंस येथे खोली बुक केली. तेथील खोली क्रमांक ३११ मध्ये ते मुक्कामाला होते. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हॉटेलच्या लॅंड लाईन शुभमसाठी फोन आला.

हॉटेलचे मॅनेजर दिलीप बावणे यांनी फोन उचलला. त्यांनी रूमबॉयला कांबळे यांना आवाज देण्यासाठी पाठविले. मात्र खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. मॅनेजरदेखील खोलीसमोर गेले व आवाज दिला. मात्र आतून काहीच आवाज आला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने तेथे येऊन दार उघडले असता शुभम कांबळे बेडवर बेशुद्ध पडले होते व खोलीतून रसायनाचा दुर्गंध येत होता. त्यांना उपचारासाठी मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गणेशपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- सुसाईड नोटमधून झाला खुलासा

खोली क्रमांक ३११ मध्ये पोलिसांना विविध रसायनांच्या चार ते पाच बाटल्या आढळून आल्या. तसेच सुसाईड नोटदेखील सापडली. मी स्वत:च्या मनाने आत्महत्या करत आहे. याला कुणीही जबाबदार नाही असे त्यात नमूद होते. आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याने मनात खंत असल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहीले होते. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता कांबळे हे एफडीएमध्ये निरीक्षक असल्याची बाब समोर आली.

- खोलीतच तयार केले विषारी द्रव्य

कांबळे यांनी चार ते पाच बॉटल्समधील रसायनांचे मिश्रण करून हॉटेलच्या खोलीतच विषारी द्रव्य तयार केले. त्याच्याच प्राशनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित बाटल्या तपासणीसाठी पाठविल्या आहेत. तसेच सविस्तर चौकशी सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूर