शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

मराठीत प्रश्न विचारल्याने ‘आरटीआय’चा उत्तर देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 1:48 PM

Marathi RTI Nagpur Newsमराठी ही कामकाजाची भाषा असलेल्या राज्याच्या उपराजधानीत मराठीत प्रश्न विचारले म्हणून त्याचे उत्तर देण्याचे विभागाने टाळले आहे.

ठळक मुद्देमराठीत विचारू नका ‘आरटीआय’चे प्रश्नकेंद्राच्या विभागांना महाराष्ट्रात मराठीचे वावडेप्रश्न हिंदी किंवा इंग्रजीत मागितले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसामान्यांना अगदी सहजपणे शासकीय विभागांच्या कारभाराची माहिती मिळावी यासाठी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. अनेकदा शासकीय विभागांकडून या कायद्याची पायमल्लीदेखील होताना दिसते. मात्र केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) अधिकाऱ्यांनी कहरच केला आहे. मराठी ही कामकाजाची भाषा असलेल्या राज्याच्या उपराजधानीत मराठीत प्रश्न विचारले म्हणून त्याचे उत्तर देण्याचे विभागाने टाळले आहे. सोबतच पुढील वेळी प्रश्न चक्क हिंदी किंवा इंग्रजीत विचारावे असा अगावू सल्लादेखील दिला आहे. यामुळे केंद्र शासनाच्या विभागांना महाराष्ट्रात काम करत असताना मराठीचे वावडे आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ‘सीजीएचएस’कडे अर्ज केला होता. १ एप्रिल २०१६ ते १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत ‘सीजीएचएस’च्या ‘कार्डहोल्डर्स’वर किती रुपयांचा निधी खर्च झाला, किती रुपयांची औषध खरेदी करण्यात आली, किती सदस्य कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. नियमांनुसार त्यांचे प्रश्न बरोबर होते. मात्र ‘सीजीएचएस’च्या अधिकाऱ्यांनी भलतेच कारण देत उत्तर देण्याचे टाळले. अर्जदाराने मराठीत प्रश्न विचारले आहेत तसेच ते वाचण्याजोगे नाही असा दावा करत उत्तर देण्यास नकार दिला. सोबतच पुढील वेळी प्रश्न इंग्रजी किंवा हिंदी भाषेतच विचारावे असा सल्लादेखील दिला आहे.

कायद्याचे उघडपणे उल्लंघनमाहिती अधिकार कायद्यातील तरतूदींनुसार सरकारी विभागांना अर्जावर समाधानकारक उत्तर देणे बंधनकारक आहे. कोलारकर यांनी मराठी भाषेत प्रश्न विचारले होते. महाराष्ट्रात मराठी भाषा शासकीय कामकाजात वापरण्यात येते. माहिती अधिकार कायद्याच्या कलम ६(१) नुसार अर्जदार हा इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित भागातील अधिकृत भाषेमध्ये प्रश्न विचारू शकतो. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. तरीदेखील मराठीचे अस्तित्वच नाकारण्याचा प्रकार ‘सीजीएचएस’तर्फे झाला आहे.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार