शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मनातील भाव उतरले कॅनव्हासवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:50 IST

प्रत्येकाच्या मनात अनेक भाव लपलेले असतात, एकांतवासात ते आपण अनुभवतो, स्वप्नांमध्ये त्याची प्रचिती होते. पण सामान्य माणूस जगण्याचा आटापिटा करताना ते भाव हरवूनही जातो. पण कलावंत त्या भावनांना कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटतात आणि त्यातून एका कलाकृतीची निर्मिती होते. आर्किटेक्ट मीनाक्षी पवार यांनी अशाच मनातील भावनांना कॅनव्हासवर साकारून आकर्षक आणि मनाला विचार करण्यास भाग पाडणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत.

ठळक मुद्देमीनाक्षी पवार यांच्या कलाकृतीचे जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येकाच्या मनात अनेक भाव लपलेले असतात, एकांतवासात ते आपण अनुभवतो, स्वप्नांमध्ये त्याची प्रचिती होते. पण सामान्य माणूस जगण्याचा आटापिटा करताना ते भाव हरवूनही जातो. पण कलावंत त्या भावनांना कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटतात आणि त्यातून एका कलाकृतीची निर्मिती होते. आर्किटेक्ट मीनाक्षी पवार यांनी अशाच मनातील भावनांना कॅनव्हासवर साकारून आकर्षक आणि मनाला विचार करण्यास भाग पाडणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत.लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये मीनाक्षी पवार यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. शनिवारी त्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कलावंत सुधीर तलमले यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रकांत बांगडे उपस्थित होते. मीनाक्षी या मूळच्या चंद्रपुरातील आहेत. त्यांनी आर्किटेक्टची पदवी मिळविली आहे. पण त्यांना पेंटिंगची आवड आहे. त्यांनी आपल्या कलेतून एक वेगळी स्टाईल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘युफोरिया’ या थीमवर त्यांनी साकारलेल्या चित्रकृतीमधून त्यांच्या मनातील आनंदाचे भाव वेगवेगळ्या कलाकृतीतून व्यक्त केले आहे. आपल्या भावना मांडताना त्यांनी सोनेरी रंगाचा प्रत्येक कलाकृतीत भरपूर वापर केला आहे. सोनेरी रंग हा आनंदाचा आभास व्यक्त करणारा रंग म्हणून प्रेषित करतो. त्यांनी व्यक्त केलेल्या आनंदछटा कलाकृतीतून व्यक्त केल्या आहेत. सोनेरी रंगाचा वापर केल्यामुळे प्रत्येक कलाकृतीत आकर्षकता दिसून येत आहे. काही कलाकृतीमध्ये सोनेरी रंगातून स्त्रीचे अस्तित्व दाखविले आहे. या जगात स्त्री श्रेष्ठ असल्याचे तिने आपल्या कलाकृतीतून सांगितले आहे. तसेच पुरुष आणि स्त्रीच्या भावनांना सोनेरी आणि रुपेरी रंगातून दर्शविल्या आहेत.प्रदर्शनात मांडलेल्या २३ ही कलाकृती त्यांनी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीतून साकारल्या आहेत. या सर्व कलाकृती माझे मन, मनाला झालेला आनंद याला व्यक्त करणाऱ्या असल्याचे मीनाक्षी आपल्या चित्राबद्दल बोलताना सांगते.

टॅग्स :Jawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीpaintingचित्रकला