शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रसामुग्रीची कमी, कशी होणार स्वच्छ नदी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:44 IST

शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला रविवारी धडाक्यात सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. पावसाळ्यापूर्वी नद्यांची स्वच्छता करावयाची असल्यास यासाठी १४ ते १५ पोक्लेनची गरज भासणार आहे. मात्र दोन दिवस पाच पोक्लेन उपलब्ध झाल्या. अभियानात सहभागी विविध संस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली. मात्र त्यांच्या पोक्लेन वा अन्य यंत्रसामुग्री नसल्याने खर्चाची तयारी दर्शविली. परंतु पोक्लेन उपलब्ध होत नसल्याने अभियानात यंत्रसामुग्रीची कमतरता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसेवाभावी संस्थांची मदतीची तयारी पण पोक्लेन मिळेना : कंत्राटदार मदतीसाठी तयार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला रविवारी धडाक्यात सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. पावसाळ्यापूर्वी नद्यांची स्वच्छता करावयाची असल्यास यासाठी १४ ते १५ पोक्लेनची गरज भासणार आहे. मात्र दोन दिवस पाच पोक्लेन उपलब्ध झाल्या. अभियानात सहभागी विविध संस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली. मात्र त्यांच्या पोक्लेन वा अन्य यंत्रसामुग्री नसल्याने खर्चाची तयारी दर्शविली. परंतु पोक्लेन उपलब्ध होत नसल्याने अभियानात यंत्रसामुग्रीची कमतरता निर्माण झाली आहे.नागनदी स्वच्छतेच्या कामासाठी तीन पोक्लेन आहेत. तर पिवळी नदी व पोरा नदी स्वच्छतेच्या कामावर प्रत्येकी एक पोक्लेन आहे. यात लवकरच वाढ केली जाईल, अशी माहिती अभियानातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र पोक्लेन प्रामुख्याने मोठ्या कंत्राटदारांकडे आहेत. आपली कामे सोडून महापालिकेच्या नदी स्वच्छता अभियानाासाठी पोक्लेन उपलब्ध करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. यामुळे प्रशासनापुढे अडचण निर्माण झाली आहे.शहराच्या मध्यातून वाहणाºया नागनदीचे स्वच्छता अभियान २०१३ पासून राबवण्यात येत आहे. या नदीच्या किनाºयावर ३६ झोपडपट्ट्या आहेत. पावसाळ्यात तेथे पाणी शिरण्याचा धोका असल्याने नदी स्वच्छता अभियान राबविले जाते. १८ किलोमीटर लांबीच्या नागनदीच्या पात्राचे विविध टप्प्यात विभाजन करून महापालिकेने स्वच्छता अभियान हाती घेतले.यशवंत स्टेडियमजवळ रविवारी नागनदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.अंबाझरी ते पंचशील टॉकीज, पंचशील टॉकीज ते अशोक चौक, अशोक चौक ते केडीके महाविद्यालय, केडीके महाविद्यालय ते पिवळी नदी संगम असा नागनदी स्वच्छतेचा मार्ग आहे. पोरा नदी स्वच्छता अभियानाला सहकार नगर घाटापासून सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात पोरा नदीला पूर आल्यास या भागात पुराची पाणी शिरले होते. येथील नदीपात्र लहान असल्याने व पुढे नदी पात्रात गाळ व कचरा साचून असल्याने पुराचे पाणी तुंबले होते. त्यामुळे नदी स्वच्छता अभियान राबविताना संपूर्ण पात्रातील गाळ व कचरा काढण्यासोबतच गरज असेल त्या ठिकाणी खोलीकरण अपेक्षित आहे. मात्र पुरेशी यंत्रसामुग्री नसल्याने खोलीकरणाचे काम होताना दिसत नाही.शहरातील नद्यांच्या स्वच्छतेकरिता एकूण १० एक्झिक्युटिव्ह ग्रुप तयार करण्यात आले असन त्यात कार्यकारी अभियंता हे चमूप्रमुख आहेत. या ग्रुपमध्ये सहायक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी, उपअभियंता, झोन स्तरावरील आरोग्य अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे. झोनस्तरावर जबाबदारी विभाजित करण्यात आली आहे. नद्या स्वच्छता अभियानासाठी मनुष्यबळाची फारशी गरज नाही तर आवश्यकता यंत्रसामुग्रीची आहे.पावसाळी नाल्या सफाईकडे दुर्लक्षमान्सूनपूर्व कामे दरवर्षी केली जातात. यात पावसाळी नाल्यांचाही समावेश असतो. यावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र जोराचा पाऊ स झाला की शहरात ठिकठिकाणी पाणी साचते. पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढला जात नसल्याने पाणी वस्त्यात शिरते. पावसाळी नाल्यातील कचरा व गाळ काढला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात गाळ व कचरा काढण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका