शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

स्टॅम्प ड्युटीत कपात करा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:08 IST

- बांधकाम क्षेत्राला मिळेल बूस्ट : कपात पुढेही वाढविण्याची मागणी नागपूर : कोरोना महामारीत बांधकाम क्षेत्रावर संकट असताना राज्य ...

- बांधकाम क्षेत्राला मिळेल बूस्ट : कपात पुढेही वाढविण्याची मागणी

नागपूर : कोरोना महामारीत बांधकाम क्षेत्रावर संकट असताना राज्य शासनाने दोन टप्प्यात स्टॅम्प ड्युटीत अनुक्रमे तीन आणि दोन टक्के कपात केली. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण संचारले होते. ३१ मार्च २०२१ पर्यंत असलेल्या कपातीचा फायदा सामान्यांना झाला. ही कपात पुढे कायम ठेवण्याची मागणी राज्यातील बिल्डरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना शासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे घर खरेदी-विक्री कमी झाल्याने राज्य शासनाने महसुलाचे लक्ष्य पूर्ण होत नव्हते. त्यामुळे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्टॅम्प ड्युटी ३ टक्के आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के कपात केली होती. त्यामुळे राज्यात शासनाने महसुलाचे लक्ष्य पूर्ण झाले आणि बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळाला. कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यावर गरजू लोकांनी घरे विकत घ्यायला सुरुवात केली. त्यांचा चांगलाच फायदा झाला.

बांधकाम क्षेत्रात सहसा ३० किंवा ४० लाखांपर्यंतची घरे जास्त विकली जातात. ही घरे खरेदी करणारे सामान्यच असतात. बँकांमधून कर्ज घेऊन घर खरेदीची हिंमत करतात. तीन आणि दोन टक्के कपात केली तेव्हा याच ग्राहकांनी पुढे येऊन घर खरेदी केली. तेव्हा त्यांना ३० लाखांवर तीन टक्के कपातीनुसार ९० हजार आणि दोन टक्के कपातीनुसार ६० हजारांचा फायदा मिळाला. असाच फायदा पुढे मिळत राहिल्यास सामान्य ग्राहक घर खरेदीसाठी पुढे येतील आणि बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळेल, असे मत बिल्डर्सनी व्यक्त केले. पुढे स्टॅम्प ड्युटीमध्ये राज्य शासन कपात करीत नसेल तर फार कमी लोक घर खरेदीसाठी पुढे येतील. बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन आणि सामान्यांना घर खरेदी सवलतीच्या दरात करू द्यायची असेल तर शासनाने स्टॅम्प ड्युटी कपातीचा निर्णय पुन्हा घ्यावा, असे मत बिल्डर्सनी व्यक्त केले.

स्टॅम्प ड्युटी कपात करण्याची क्रेडाईची मागणी

सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत स्थिती बिघडली आहे. ही स्थिती सहा महिने राहण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात ठेवून महाराष्ट्र के्रडाईने राज्य शासनाकडे स्टॅम्प ड्युटी कपात करण्याची मागणी केली आहे.

-तरच सामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार

कोरोना काळात घर खरेदीसाठी कुणीही पुढे येत नाही. स्टॅम्प ड्युटीत कपात केल्यानंतरच ग्राहक पुढे आले. आता पुन्हा पूर्वीसारखीच स्थिती झाली आहे. सामान्यांचे घरांचे स्वप्न आणि महसुलाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीत कपात करावी.

महेश साधवानी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई मेट्रो.

स्टॅम्प ड्युटीत पुढेही कपात करावी

बांधकाम क्षेत्राला बूस्ट आणि सामान्यांना फायदा होण्यासाठी राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीत कपात पुढेही वाढवावी. कपातीच्या काळात बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांना रोजगार व व्यवसाय मिळाला होता. कपातीमुळे शासनाचे नुकसान झाले नाही, शिवाय महसूल वाढला.

गौरव अगरवाला, सचिव, नागपूर क्रेडाई मेट्रो.