शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तोटा कमी करण्यासाठी बस सीएनजीवर चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:43 IST

नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका शहर बस सेवा चालवित आहेत. शहर बस तोट्यात आहे म्हणून काही मार्गावरील बस बंद करणे योग्य नाही. तोटा कमी करण्यासाठी रेड बस सीएनजीवर चालवा, असे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी आयोजित शहर बस आढावा बैठकीत दिलेत.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांचे निर्देश : शहर बसचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका शहर बस सेवा चालवित आहेत. शहर बस तोट्यात आहे म्हणून काही मार्गावरील बस बंद करणे योग्य नाही. तोटा कमी करण्यासाठी रेड बस सीएनजीवर चालवा, असे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी आयोजित शहर बस आढावा बैठकीत दिलेत.वर्ष २००७ पूर्वी शहर बससेवा ही राज्य सरकारमार्फत संचालित केली जात होती. त्यानंतर, महापालिकांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिकेने वंश निमय कंपनीकडे शहर बस सेवा सोपविली़ मात्र ही कंपनी बससेवा चालविण्यात अपयशी ठरली़ परिणामी वंश सोबतचा करार रद्द करण्यात आला़ गतवर्षी मनपाने तीन नवीन आॅपरेटर नेमून त्यांच्याकडे शहर बस सेवा सोपविली़ शहरातील स्टार बस (रेड बस) या तिन्ही आॅपरेटरला विभागून देण्यात आल्या़ तर ग्रीन बस स्कॅनिया कंपनी चालवित आहे़ त्यानंतरही तोटा वाढत असल्यामुळे काही मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या़ तसेच तिकिटाचे दर वाढविण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेतली़ नागरिकांना चांगली सेवा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असल्याने ग़्रीन बस सेवा देखील बंद करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप तसेच शहर बससेवा सांभाळणारे सर्व आॅपरेटर उपस्थित होते़बस भाडे वाढणारडिझेलचे दर वाढत असल्याने शहर बसच्या तोट्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात १८ ते २० टक्के प्रस्तावित आहे. बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेपासून भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला आहे. या प्रस्तावाला गडकरी यांच्याकडून सहमती घेतली जाणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका