शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगावरील औषधांच्या किमती कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:45 IST

मधुमेह व कर्करोगावरील औषधांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने जीएसटी कौन्सिलकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी मधुमेह, कर्करोग या आजारावरील औषधांच्या किमती कमी करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

ठळक मुद्देवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार: जीएसटी कौन्सिलकडे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मधुमेह व कर्करोगावरील औषधांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने जीएसटी कौन्सिलकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी मधुमेह, कर्करोग या आजारावरील औषधांच्या किमती कमी करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.प्रश्नाच्या उत्तरात मुनगंटीवार म्हणाले, दुर्धर आजारावरील औषधांच्या किमती कमी करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी जीएसटी कौन्सिलकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्या अशा औषधांवर १२ टक्के जीएसटी आहे. राज्य शासनाने अशा औषधांवर ५ टक्के जीएसटी लावावा, अशी मागणी केली आहे. राज्य शासनाने औषधे करमुक्त केली होती. मात्र जीएसटी कौन्सिलकडे निर्णयानुसार यावर जीएसटी द्यावा लागतो. राहुल नार्वेकर यांनी जीएसटीमुळे रुग्णांना महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याचे सांगितले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी गरीब रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. गोरगरिबांना अशा आजारासाठी मोफत औषधे देण्याचा शासन विचार करीत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, जगन्नाथ शिंदे, अनिकेत तटकरे, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.सहा महिन्यात आरोग्य केंद्राना औषध पुरवठाहाफकिन इन्स्टिट्यूटमार्फत राज्यातील विविध दवाखान्यांना लागणारी औषधे एकत्रित खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यात सर्व आरोग्य केंद्राना औषध पुरवठा केला जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा जाणवतो याबाबत हाफकिन इन्स्टिट्यूट औषधांची खरेदी कधी करणार असा प्रश्न विचारला होता. डॉ.सावंत म्हणाले, शासनाने १६८ कोटींची औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून १४९ पुरवठा आदेश निर्गमित केले आहेत. तसेच आवश्यकता वाटल्यास उपचारासाठी एकूण खरेदीच्या दहा टक्के एवढी औषधांची खरेदी करण्याचे अधिकार दवाखान्यांना दिलेले आहेत. सदस्य सतेज पाटील यांनी एकाच कंपनीकडून ७५० कोटींची खरेदी कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला. एकत्रित खरेदीमुळे शासनाचे २५० कोटी कमी खर्च होणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. जयंत पाटील यांनीही चर्चेत  सहभाग घेतला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८cancerकर्करोग