शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेडिरेकनर दरवाढ, मालमत्ता खरेदी महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:00 IST

रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मागणीच्या विपरित राज्य शासनाने शुक्रवारी रेडिरेकनर (जमिनीचे सरकारी मूल्य) दरात वाढ केली आहे. राज्यात सरासरी १.७४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यात ०.६० टक्के वाढ झाली आहे. मनपा क्षेत्रात ०.१ टक्के जास्त द्यावे लागेल.

ठळक मुद्दे नागपूर जिल्ह्यात ०.६० टक्के वाढ : मनपा क्षेत्रात केवळ ०.१ टक्के वाढ : रिअल इस्टेट क्षेत्रात निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मागणीच्या विपरित राज्य शासनाने शुक्रवारी रेडिरेकनर (जमिनीचे सरकारी मूल्य) दरात वाढ केली आहे. राज्यात सरासरी १.७४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यात ०.६० टक्के वाढ झाली आहे. मनपा क्षेत्रात ०.१ टक्के जास्त द्यावे लागेल.राज्य शासनाने मनपा क्षेत्रात १.०२ टक्के वाढ केली आहे. केवळ मुंबई आणि उपनगरात रेडिरेकनरचे दर कमी केले आहेत. आता या ठिकाणी ०.६ टक्के दर कमी लागणार आहे. परंतु नागपूरसह संपूर्ण विदर्भात दरवाढ केली आहे. नागपूर ग्रामीण क्षेत्रात हे दर १.१३ टक्के वाढले आहेत. तर नगरपालिका क्षेत्रात ०.७७ टक्के वाढ झाली आहे. विदभार्तील अन्य जिल्ह्याची वाढ पाहता अमरावतीमध्ये सरासरी १.६२ टक्के, अकोला १.७०, वाशिम १.९९, यवतमाळ १.६२, बुलढाणा १.४५, चंद्रपूर ०.९७, वर्धा ०.८७, भंडारा ०.०५, गोंदिया ०.२२ आणि गडचिरोली ०.८३ टक्के वाढ झाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेडिरेकनर दर कमी करण्याची मागणी करीत होते. मुद्रांक शुल्कात झालेल्या कपातीने याचे संकेत मिळाले होते. परंतु महसुलात होणारी घट टाळण्यासाठी शासनाने रेडिरेकनर दर वाढविले. या निर्णयाने रिअल इस्टेट क्षेत्रात निराशा आहे. सध्या बांधकाम क्षेत्राची स्थिती पाहता शासनाने दर कमी करायला हवे होते.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगInflationमहागाई