शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:01 IST

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा लूक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतचे सादरीकरण केले.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचा मनपाला प्रस्ताव : महापालिका आयुक्तांसमोर सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा लूक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतचे सादरीकरण केले. यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, आयआरएसडीसीचे तज्ज्ञ वास्तूविशारद पी. एस. उत्तरवार, कार्य. महाव्यवस्थापक अश्विनी कुमार, उपमहाव्यवस्थापक (अर्बन डिझायनर) परोमिता रॉय, वास्तूविशारद आलिशा अकबर प्रामुख्याने उपस्थित होते.अश्विनी कुमार व पी. एस. उत्तरवार यांनी प्रकल्पाची माहिती दिली. परोमिता रॉय आणि आलिशा अकबर यांनी स्थानकाच्या प्रस्तावित विकासाची माहिती दिली. त्यात सुविधा राहणार आहे. यासंदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण केले. नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आधुनिक सुविधाने परिपूर्ण असे भारतातील क्लास वनचे स्थानक तयार होणार आहे.जागतिक धर्तीवर नागपूर मध्यवर्ती स्थानकाच्या विकासाच्या योजनेला गती देण्याचे काम सुरू आहे. आयआरएसडीसीने देशभरातील निवडलेल्या ए-वन क्षेणीतील रेल्वे स्थानकामध्ये नागपूरचा समावेश केला आहे. बेल्जियमच्या टीमने नागपूर स्थानकाची पाहणी केली आहे. स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने आयआरएसडीसीची यंत्रणा स्थानकांचा विकास करणार असल्याची माहिती पी. एस. उत्तरवार यांनी दिली.नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना जागेच्या अभावाची समस्या जाणवत होती. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या बाजूची जागा, सेना भवन, मध्य प्रदेश परिवहन महामंडळ, मॉडेल स्कूलची जागा अधिग्रहित केली आहे. ही जागा अधिग्रहित करून नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे मॉडेल तयार केले आहे. या पुनर्विकासाच्या कामात नागपुरातील स्टेक होल्डरांना सहभागी होण्याचे आवाहन अश्विनी कुमार यांनी केले.अभिजित बांगर म्हणाले, रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महापालिका सदैव आयआरएसडीसीच्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारच्या कामाची आवश्यकता भासल्यास महापालिका रेल्वे प्रशासनासोबत असेल. यावेळी तेजींदरसिंग रेणू, हेमंत गांधी, अतुल पांडे, कैलाश जोगानी, कॅप्टन चंद्रमोहन रणधीर, हेमंत नानोटी यांच्यासह मनपाच्या नगर रचना विभागाचे अधिकारी व नागपुरातील स्टेक होल्डर प्रामुख्याने उपस्थित होते

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका