शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

मर्जीतील अभियंत्यांसाठी सोयीचे रस्ते

By admin | Updated: June 24, 2014 00:53 IST

सार्वजनिक बांधकाम खात्यात मर्जीतील अभियंत्यांसाठी त्यांच्या सोयीचे प्रशासकीय मार्ग निर्माण केले गेले आहेत. हे सर्व मार्ग व्हाया नाशिक जात असून या मार्गांवर ‘टोल’ नाकेही लावण्यात आले आहेत.

व्हाया नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्यात टोल-फ्री काहीच नाही राजेश निस्ताने - यवतमाळसार्वजनिक बांधकाम खात्यात मर्जीतील अभियंत्यांसाठी त्यांच्या सोयीचे प्रशासकीय मार्ग निर्माण केले गेले आहेत. हे सर्व मार्ग व्हाया नाशिक जात असून या मार्गांवर ‘टोल’ नाकेही लावण्यात आले आहेत. या खात्यात सचिवापासून ते कनिष्ठ अभियंत्यापर्यंतच्या नियुक्त्या वादग्रस्त ठरल्या आहेत. गेली अडीच वर्ष सचिवपदी व्ही.आर. नाईक की प्रदीप गणवीर हा वाद सुरू होता. न्यायालयीन निर्णयाचा आडोसा आणि ‘दादां’च्या आशीर्वादाने अखेर नाईकांनी बाजी मारली. परंतु गणवीरांनी अद्याप न्यायालयाचा मार्ग न सोडल्याने पुन्हा फेरबदलाची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता या प्रमुख रिक्त पदांवरील नियुक्त्यांचाही बोजवारा उडाला आहे. ही पदे अधिकाधिक काळ रिक्त रहावी, त्यांचा अतिरिक्त प्रभार दिला जावा, यातच बांधकाम खात्याचा अधिक ‘इन्टरेस्ट’ दिसून येतो. त्यामुळेच वर्षानुवर्षे हेतुपुरस्सर बढत्या, बदल्यांच्या फाईली थांबविणे, त्यात तांत्रिक त्रुट्या निर्माण करणे असा कारभार सुरू आहे. त्यामुळेच अनेक अभियंते सेवानिवृत्त झाले पण त्यांना बढती मिळू शकली नाही. कौटुंबिक अडचणी असूनही विनंतीनुसार बदल्या मिळत नाहीत. महाराष्ट्रात सर्वत्र सारखीच स्थिती आहे. मर्जीतील अभियंत्यांना मात्र पाहिजे तेथे दुहेरी प्रभाराचे मार्ग उपलब्ध करून दिले जात आहेत. एकीकडे दोन ते तीन प्रभार तर दुसरीकडे नियुक्तीची प्रतीक्षा असे चित्र आहे. बांधकाम खात्यात ‘टोल-फ्री’ काहीच नाही, असे अभियंते सांगतात.