शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

धोकादायक हायटेन्शनन लाईनबाबत अधिकारी व नागरिकांकडून खर्च वसूल करा; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 10:10 IST

धोकादायक हायटेन्शन लाईनच्या समस्येवर उपाययोजना शोधण्यासाठी येणारा खर्च संबंधित अधिकारी व नागरिकांकडून वसूल करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.

ठळक मुद्दे२ कोटी ५० लाख कोण देणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धोकादायक हायटेन्शन लाईनच्या समस्येवर उपाययोजना शोधण्यासाठी येणारा खर्च संबंधित अधिकारी व नागरिकांकडून वसूल करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहे. न्यायालयाने धोकादायक हायटेन्शन लाईनच्या समस्येवर उपाययोजना शोधण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीने या कामासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. न्यायालयाने ही रक्कम महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, महावितरण व अन्य संबंधित संस्थांच्या जबाबदार विद्यमान व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून आणि हायटेन्शन लाईनजवळ अवैधपणे घरे बांधणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यास सांगितले आहे.कुणाकडून किती रक्कम घ्यायची व ती रक्कम कशी वसूल करायची, याचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समस्येसाठी अधिकारी व नागरिक दोघेही सारखेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:च्या चुकीचे लाभ उपभोगण्याची मुभा देऊन या कामावर सार्वजनिक निधी खर्च करणे योग्य होणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने हा आदेश देताना नोंदविले आहे. जबाबदार नागरिकांकडून वसूल करावयाची रक्कम त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर निश्चित करण्यात यावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. अधिकारी व नागरिकांकडून खर्च वसूल करण्याच्या मुद्यावर समितीला येत्या १४ फेब्रुवारी रोजीच्या सुनावणीत मत मांडण्यास सांगण्यात आले आहे. खर्च वसुलीचा निर्णय एकतर्फी होऊ नये यासाठी हायटेन्शन लाईनजवळ नियमबाह्यपणे घरे बांधणाऱ्या नागरिकांना याप्रकरणात प्रतिवादी करण्याचा व त्यांच्या नावाने मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस प्रकाशित करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या नागरिकांना येत्या १४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात उपस्थित होण्यास सांगण्याची सूचना करण्यात आली आहे. न्यायालयात सादर प्रतिज्ञापत्रानुसार नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या क्षेत्रात ३४९ तर, महानगरपालिकेच्या क्षेत्रात ५७३ घरे हायटेन्शन लाईनपासून धोकादायक अंतरावर आहेत. याशिवाय प्रकरणातील मध्यस्थ सामाजिक कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी १५० वर घरांची वेगळी यादी सादर केली आहे. नासुप्र व मनपाला या सर्वांच्या नावाने नोटीस प्रकाशित करायची आहे.

जनहित याचिका प्रलंबितआरमर्स बिल्डर्सने नारी येथील सुगतनगर येथे अवैधरीत्या बांधलेल्या एका इमारतीमध्ये प्रियांश व पीयूष धर या जुळ्या भावंडांचा हायटेन्शन लाईनच्या संपर्कात आल्यामुळे गेल्यावर्षी मृत्यू झाला. न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. नियमानुसार कोणत्याही बांधकामाचे अंतर हायटेन्शन लाईनपासून चार मीटर असणे आवश्यक आहे. परंतु, शहरात अनेक ठिकाणी या नियमाची पायमल्ली करून बांधकामे करण्यात आली आहेत. याप्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.मध्यस्थी अर्ज मंजूरन्यायालयाने जबलपुरे यांचा मध्यस्थी अर्ज मंजूर करून त्यांनी सादर केलेली धोकादायक घरांची यादी रेकॉर्डवर घेतली. धर भावंडांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले महावितरण, नगर रचना विभाग व मनपाचे अधिकारी आणि बिल्डर यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, प्रकरणाची वेळीच दखल घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे जरीपटका पोलीस व अन्य संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी जबलपुरे यांची मागणी आहे. त्यांच्यातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वाहणे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय