शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील धुर्वे कुटुंबाच्या विक्रमाची ‘आशिया बुक’मध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:07 IST

लांब पल्ल्याचे सागरी जलतरणपटू सुखदेव धुर्वे यांनी पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईतील ‘एलिफंटा केव्ह ते गेट वे ऑफ इंडिया’ हे १६ कि. मी. सागरी अंतर अवघ्या ४.५० तासांत पोहून पूर्ण केले.

ठळक मुद्दे ‘एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया’ सागरी अंतर ४.५० तासात पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लांब पल्ल्याचे सागरी जलतरणपटू सुखदेव धुर्वे यांनी पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईतील ‘एलिफंटा केव्ह ते गेट वे ऑफ इंडिया’ हे १६ कि. मी. सागरी अंतर अवघ्या ४.५० तासांत पोहून पूर्ण केले. गतषर्वी २८ एप्रिल रोजी त्यांनी केलेल्या या विक्रमाची नोंद ‘आशिया बुक’मध्ये झाली. आशिया खंडातील ४८ देशांमध्ये एखाद्या कुटुंबाने प्रथमच अशी कामगिरी केली आहे.नागपूर पोलीस खात्यात कॉन्स्टेबल असलेले सुखदेव यांनी पत्नी वैशाली, मुलगा सार्थक आणि मुलगी तन्वी यांच्यासोबतीने हा विक्रम केला. आशिया बुकचे प्रमाणपत्र प्राप्त होताच नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी धुर्वे कुटुंबीयांना पोलीस आयुक्तालयात आमंत्रित केले. त्यांना ५० हजारांचा रोख प्रोत्साहनपर पुरस्कार दिला. उपाध्याय यांनी धुर्वे कुटुंबाच्या कर्तृत्वाचा गौरव करीत सुखदेव यांना भविष्यातील मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.अनेक स्पर्धा गाजविणारे सुखदेव यांनी २५ कि.मी. जिब्राल्टर खाडी, धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३५ कि.मी. सागरी अंतर,रेवास ते गेट वे ऑफ इंडिया हे २५ कि.मी. अंतर आणि मोरा ते गेट वे ऑफ इंडिया हे १९ कि.मी. अंतर विक्रमी वेळेत पोहून पूर्ण केले आहे.या कामगिरीबद्दल त्यांचा सारर्थी पुरस्कार, विदर्भ गौरव, राजा शिवछत्रपती पुरस्कार, बॅरिस्टर शेषराव वानखेडे पुरस्कार आणि वीर बिरसा मुंडा पुरस्काराने गौरव झाला आहे.त्यांची पत्नी वैशाली या जिल्हा परिषदेत शिक्षिका असून राज्य शालेय क्रीडा जलतरणात १५ पदकांसह आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेतही पदकविजेत्या आहेत. मालवणच्या समुद्रात ३ कि. मी शर्यतही त्यांनी गाजवली. मुलगा सार्थक हा तीनवेळा राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णविजेत्या महाराष्ट्र संघाचा जलतरणपटू आहे. सार्थकला १७ आणि १९ वर्षे गटातही सुवर्णपदके मिळाली. ९ वर्षांची तन्वी शहरस्तरावर सुवर्णविजेती जलतरणपटू असून ५०० मीटर अंतराच्या सागरी जलतरणात तिचा नियमित सहभाग असतो. आजच्या सत्कार सोहळयाला सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, उपायुक्त विक्रम साळी, मनोज सुतार, नाईक, बेंद्रे, राजेश मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Swimmingपोहणे