शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अंतर्गत शक्ती ओळखा व जीवनात यशस्वी व्हा

By admin | Updated: January 4, 2015 01:00 IST

तुम्ही बाहेर शोधता ते तुमच्याच जवळ आहे. तुम्ही अनोखे, विशेष आणि महान आहात. तुमची प्रशंसा करून कुणी तुम्हाला प्रोत्साहन देत असेल तर काम करण्याची ऊर्जा मिळते.

सचिन बुरघाटे यांचा सल्ला : ‘स्वत:ला ओळखा’ या विषयावर चर्चासत्रनागपूर : तुम्ही बाहेर शोधता ते तुमच्याच जवळ आहे. तुम्ही अनोखे, विशेष आणि महान आहात. तुमची प्रशंसा करून कुणी तुम्हाला प्रोत्साहन देत असेल तर काम करण्याची ऊर्जा मिळते. आपल्यातील अंतर्गत शक्ती ओळखा आणि जीवनात यशस्वी व्हा, असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इंग्रजी भाषातज्ज्ञ आणि ट्रेनर सचिन बुरघाटे यांनी येथे दिला. डॉ. दंदे फाऊंडेशनच्या वतीने पालकांना त्यांच्या अंतर्गत शक्तीचा परिचय करून देण्यासाठी ‘स्वत:ला ओळखा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात शनिवारी करण्यात आले. आपल्यातील अंतर्गत शक्तीला ओळखून पालक आणि विद्यार्थ्यांनी काम केले तर यशाचे अनेक टप्पे गाठता येतील, असे ते म्हणाले. मंचावर प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, युनिमास अ‍ॅबाकसचे दिलीप जैन आणि डॉ. दंदे फाऊंडेशनचे डॉ. पिनाक दंदे होते. आत्मविश्वास वाढवाबुरघाटे यांनी सांगितले की, जगात तुम्ही एकमेव आहात. स्वत्वाची भावना नेहमीच बाळगा. आत्मविश्वासाचा स्तर वाढवा. आत्मविश्वास जेवढा वाढेल तेवढे तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. ध्येयपूर्तीसाठी जीवनात काय करायचे आहे, हे आधी ठरविले पाहिजे. लोक म्हणतात एवढे परिश्रम करण्याची गरज नाही, पण शेवटची संधी समजून प्रत्येकाने काम करावे. माझ्या कामाचे यश नंतर दिसेल, असे लोकांना सांगा, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करतो. इंग्रजीचे महत्त्व जास्त आहे, हे मला माहीत होते. जे लोक शिकत नाहीत, ते अज्ञानी नाहीत, पण ज्यांना आपल्यातील प्रतिभा दिसत नाहीत, ते अज्ञानी आहेत. तुम्ही कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकता. स्वत:तील क्षमता ओळखली तरच बदल दिसून येईल, असे बुरघाटे म्हणाले. सकारात्मक लोकांमुळे प्रोत्साहनतुमच्या सभोवताल सकारात्मक लोक राहिल्यास तुम्ही यशस्वी होता, हे स्पष्ट आहे. प्रोत्साहन देणाऱ्यांमुळे प्रेरणा मिळते. कुण्या मुलाला चांगले म्हटल्यास तो तसे वागण्याचा प्रयत्न करतो. जीवनात चांगले लोक फार कमी भेटतात. प्रतिकूल विचारसरणीचे लोक जास्त भेटत असल्यामुळे आपण आपल्याला भेटू शकत नाही किंवा सकारात्मक विचार करणे शक्य होत नाही. जीवनात नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या लोकांची गरज असल्याचे ते म्हणाले.प्रास्तविक डॉ. पिनाक दंदे यांनी तर संचालक प्रीती सावळे यांनी केले. चर्चासत्रात डॉक्टर्स, समाजसेवक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जीवनातील चुकांपासून शिकाजीवनातील चुका काही ना काही शिकवितात. ज्या लोकांनी जीवनात काहीतरी केले, त्यांना आपण यशस्वी म्हणतो. अशांची तुलना नेहमीच लुझरशी करतो. पण माझे स्पष्ट मत आहे की, विनरची तुलना विनरशीच व्हावी. समाजात नेहमीच असे दिसून येते की, मोठा व्यक्ती छोट्यांना चार ते पाच पद्धतीने ज्ञान देतो, पण तो मोठ्यांसमोर काहीच बोलत नाही. तेव्हा आत्मविश्वासाचा स्तर जास्त असावा लागतो. उदाहरण देताना बुरघाटे यांनी सांगितले की, तुम्ही स्वत:ला राजा समजा. तुम्ही कधीच वाकणार नाही. प्रत्येकाला वाटते की, जीवनात काहीतरी करावे, पण जे घाबरतात ते काहीच करीत नाही. निरंतर ज्ञान संपादन करा, असा उपदेश त्यांनी दिला.