मोमीनपुऱ्यातील सानूवर एमपीडीए
नागपूर : मोमीनपुरा येथील कुख्यात गुंड मो. अरबाज ऊर्फ सानूची एमपीडीएअंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कमालबाबा दरगाहजवळील निवासी सानूविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, लूट आदींसह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची मोमीनपुऱ्यात दहशत आहे. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या कारवाया सुरूच होत्या. पोलिसांनी त्याला एमपीडीएअंतर्गत अटक करून कारागृहात रवानगी केली आहे.
झाडताना वृद्धेचा मृत्यू
नागपूर : जिन्यावर झाडताना वृद्धेचा पडून मृत्यू झाला. इंदोरा, साधू मोहल्ला, जरीपटका निवासी ७० वर्षीय अनिता दिनेश डोलारे मंगळवारी सकाळी जिना झाडत होत्या. अचानक पडल्याने त्या जखमी झाल्या. मेयो रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.