शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:12 IST

उमेदवारांची नावे जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. उमेदवारी अर्जापासून वंचित राहिलेल्या अनेक इच्छुकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून बंडाचे निशाण फडकविले आहे.

ठळक मुद्देअसंतुष्टांचा भडका : नाराजांना समजावण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमेदवारांची नावे जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. उमेदवारी अर्जापासून वंचित राहिलेल्या अनेक इच्छुकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून बंडाचे निशाण फडकविले आहे. आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर त्यांना शांत करण्याची जबाबदारी आली आहे. काँग्रेसचे दोन आणि भाजपच्या एका नगरसेवकाने पक्षाविरुद्ध बंड पुकारले आहे.भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी मध्य नागपुरातून विकास कुंभारे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे बुधवारी बडकस चौकात निदर्शने करून विरोध दर्शविला. दक्षिणमध्ये आपले तिकीट कापून मोहन मते यांना दिल्याने आमदार सुधाकर कोहळे नाराज झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रात्री कोहळे यांना बोलावून समजावले. पक्षात बंडखोरी आजही सुरु होती. पक्षाचे नगरसेवक, माजी उपमहापौर सतीश होले यांनी दक्षिणमधून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला.दुसरीकडे काँग्रेसमध्येही बंडखोरी दिसून आली.नगरसेवक मनोज सांगोळे यांनी उत्तर नागपुरातून तिकीट न मिळाल्याने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य नागपुरातून नगरसेवक रमेश पुणेकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिणमधून प्रमोद मानमोडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांचे म्हणणे आहे की, पक्ष काम करणाऱ्यांना तिकीट देत नाही. जनता त्यांच्यासोबत आहे. ते विजयी होतील. यादरम्यान एकाही मुस्लीम समाजाला तिकीट न मिळाल्याने दुखावलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यात शहर उपाध्यक्ष अशरफ खान, शाहीद अंसारी, शेख जावेद, लियाकत अली, रजा अली, तोहसीफ सिद्दिकी, सना खान, अबरार खान, शेख वसीम, सलीम कुरैशी यांचा समावेश आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनीही पूर्व नागपुरातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे माजी पूर्व नागपूर संघटक यशवंत रहांगडाले यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण